1 / 6Post Office Saving Schemes: गेल्या महिन्यात एप्रिलमध्ये रेपो रेट कमी झाल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली होती. पण पोस्ट ऑफिस अजूनही आपल्या ग्राहकांना एफडीवर बंपर परतावा देत आहे. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना एफडीवर ६.९ टक्के ते ७.५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. 2 / 6पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्ष, ३ वर्ष आणि ५ वर्षांसाठी एफडी खातं उघडता येतं. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये २ लाख रुपये जमा करून ८९,९८९ रुपयांचं निश्चित व्याज कसं मिळवता येईल हे सांगणार आहोत.3 / 6पोस्ट ऑफिसला १ वर्षाच्या एफडीवर ६.९ टक्के, २ वर्षांच्या एफडीवर ७ टक्के, ३ वर्षांच्या एफडीवर ७.१ टक्के आणि ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के व्याज मिळत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये एफडीला टीडी म्हणजेच टाइम डिपॉझिट म्हणून ओळखलं जातं. 4 / 6पोस्ट ऑफिस टीडी स्कीम बँकांच्या एफडी स्कीमसारखीच आहे, जिथे गुंतवणूकदारांना गॅरंटीसह निश्चित व्याज मिळते. पोस्ट ऑफिसवर केंद्र सरकारचं नियंत्रण आहे. त्यामुळे या योजनेत जमा झालेला प्रत्येक पैसा पूर्णपणे सुरक्षित असून त्यावर तुम्हाला खात्रीशीर व्याज मिळतं.5 / 6पोस्ट ऑफिस ५ वर्षांच्या टीडीवर सर्वाधिक ७.५ टक्के व्याज देत आहे. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये ५ वर्षांच्या टीडीमध्ये २,००,००० रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण २,८९,९८९ रुपये मिळतील. 6 / 6 यात तुम्ही जमा केलेल्या २,००,००० रुपयांव्यतिरिक्त ८९,९८९ रुपयांच्या स्थिर आणि हमी व्याजाचा समावेश आहे. पोस्ट ऑफिस आपल्या सर्व ग्राहकांना टीडी खात्यावर समान व्याज देतं, मग ते सामान्य नागरिक असोत किंवा ज्येष्ठ नागरिक.