SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 08:53 IST
1 / 6SBI Saving Schemes: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आपल्या ग्राहकांना त्यांच्या एफडी खात्यांवर उत्कृष्ट व्याजदर देत आहे. या वर्षी, आरबीआयने रेपो दरात कपात केल्यामुळे, देशभरातील अनेक बँकांनी त्यांचे एफडी व्याजदर कमी केले. 2 / 6परिणामी, स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) देखील त्यांचे एफडी व्याजदर कमी केले. परंतु, दर कपात असूनही, एसबीआयच्या एफडी योजना आकर्षक परतावा देत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका एसबीआय एफडी योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही फक्त ₹१ लाख जमा करून ₹४१,८२६ चं निश्चित व्याज मिळवू शकता.3 / 6स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी खातं उघडता येतं. स्टेट बँक ऑफ इंडिया एफडी खात्यांवर ३.०५ टक्के ते ७.१० टक्के व्याज देत आहे. 4 / 6देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ४४४ दिवसांच्या अमृत वृत्ती विशेष एफडी योजनेवर सामान्य नागरिकांना ६.६० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.१० टक्के व्याज देत आहे. एसबीआय ५ वर्षांच्या एफडी योजनेवर सामान्य नागरिकांना ६.०५ टक्के व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना ५ वर्षांच्या एफडीवर ७.०५ टक्के परतावा दिला जात आहे.5 / 6जर तुम्ही सामान्य नागरिक असाल (म्हणजे तुमचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल) आणि तुम्ही एसबीआयमध्ये ५ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,३५,०१८ रुपये मिळतील. यामध्ये तुमचे ३५,०१८ रुपयांचे निश्चित व्याज समाविष्ट आहे. 6 / 6त्याचप्रमाणे, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल (म्हणजे तुमचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असेल) आणि तुम्ही एसबीआयमध्ये ५ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,४१,८२६ रुपये मिळतील. यामध्ये तुमचे ४१,८२६ रुपयांचे निश्चित व्याज समाविष्ट आहे.