By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 08:47 IST
1 / 8Bank of Baroda Savings Scheme: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना एफडी (FD) योजनांवर शानदार व्याज देत आहे. वास्तविक, गेल्या वर्षी आरबीआयनं रेपो रेटमध्ये १.२५ टक्क्यांची कपात केल्यानंतर सर्व बँकांनी एफडीचे व्याजदरही कमी केले आहेत. 2 / 8मात्र, बँक ऑफ बडोदा अजूनही एफडी खात्यांवर आकर्षक व्याज देत आहे. बँक ऑफ बडोदामध्ये किमान ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी खातं उघडता येतं. 3 / 8ही सरकारी बँक एफडी खात्यांवर ३.५० टक्क्यांपासून ते ७.०५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. आज आपण बँक ऑफ बडोदाच्या अशा एका एफडी योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये केवळ १ लाख रुपये जमा करून ४१,४७८ रुपयांपर्यंत फिक्स व्याज मिळवता येतं.4 / 8बँक ऑफ बडोदा ४४४ दिवसांच्या विशेष एफडी योजनेवर सर्वाधिक व्याज देत आहे. बँक या ४४४ दिवसांच्या योजनेवर सामान्य नागरिकांना ६.४५ टक्के, ज्येष्ठ नागरिकांना (६० वर्षांवरील) ६.९५ टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना (८० वर्षांवरील) सर्वाधिक ७.०५ टक्के व्याज देत आहे. याव्यतिरिक्त, बँक ऑफ बडोदा ५ वर्षांच्या एफडी योजनेवर सामान्य नागरिकांना ६.३० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ६.९० टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.०० टक्के बंपर व्याज देत आहे.5 / 8जर तुम्ही सामान्य नागरिक असाल आणि बँक ऑफ बडोदाच्या ५ वर्षांच्या एफडी योजनेत १,००,००० रुपये जमा केले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,३६,६९० रुपये मिळतील, ज्यामध्ये व्याजाचे फिक्स ३६,६९० रुपये समाविष्ट आहेत.6 / 8त्याचप्रमाणे, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि बँक ऑफ बडोदाच्या ५ वर्षांच्या एफडीमध्ये १,००,००० रुपये जमा केले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,४०,७८४ रुपये मिळतील, ज्यामध्ये ४०,७८४ रुपयांच्या फिक्स व्याजाचा समावेश आहे.7 / 8आणि जर तुम्ही सुपर सीनियर सिटीजन म्हणजेच अति ज्येष्ठ नागरिक असाल आणि बँक ऑफ बडोदाच्या ५ वर्षांच्या एफडी योजनेत १,००,००० रुपये जमा केले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,४१,४७८ रुपये मिळतील, ज्यामध्ये व्याजाचे फिक्स ४१,४७८ रुपये देखील समाविष्ट आहेत.8 / 8(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)