By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 09:37 IST
1 / 7Bank Of Baroda Investment: बँक ऑफ बडोदा ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांना मुदत ठेव (FD) योजनांवर जबरदस्त व्याज देत आहे. ही बँक एफडी खात्यांवर आपल्या ग्राहकांना ३.५० टक्क्यांपासून ७.०५ टक्क्यांपर्यंत व्याज ऑफर करत आहे. 2 / 7या सरकारी बँकेत किमान ७ दिवसांपासून ते कमाल १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खातं उघडता येतं. आज आम्ही तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या एका अशा विशेष एफडी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये केवळ १ लाख रुपये जमा करून तुम्ही ४१,४७८ रुपयांपर्यंतचे निश्चित व्याज मिळवू शकता.3 / 7बँक ऑफ बडोदा ४४४ दिवसांच्या विशेष एफडी योजनेवर आपल्या ग्राहकांना सर्वाधिक व्याज देत आहे. ही बँक ४४४ दिवसांच्या योजनेवर सामान्य नागरिकांना ६.४५ टक्के, ज्येष्ठ नागरिकांना (६० वर्षांवरील) ६.९५ टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना (८० वर्षांवरील) ७.०५ टक्के व्याज देत आहे. 4 / 7याव्यतिरिक्त, ५ वर्षांच्या कालावधीसाठी असलेल्या एफडी योजनेवर ही बँक सामान्य नागरिकांना ६.३० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ६.९० टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.०० टक्के दरानं भरघोस व्याज देत आहे.5 / 7जर तुम्ही सामान्य नागरिक असाल आणि बँक ऑफ बडोदाच्या ५ वर्षांच्या एफडी योजनेत १,००,००० रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला एकूण १,३६,६९० रुपये मिळतील. ज्यामध्ये ३६,६९० रुपयांच्या निश्चित व्याजाचा समावेश असेल. 6 / 7 जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि ५ वर्षांच्या एफडीमध्ये १,००,००० रुपये गुंतवले, तर तुम्हाला एकूण १,४०,७८४ रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला ४०,७८४ रुपये व्याज मिळेल. 7 / 7तसंच, जर तुम्ही अति ज्येष्ठ नागरिक (सुपर सीनियर सिटीजन) असाल आणि ५ वर्षांच्या योजनेत १,००,००० रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला एकूण १,४१,४७८ रुपये मिळतील. यामध्ये ४१,४७८ रुपयांच्या निश्चित व्याजाचा समावेश आहे.