क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:57 IST
1 / 8गाडीत इंधन भरताना क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 'फ्युएल सरचार्ज' आणि त्यावर जीएसटी द्यावा लागतो, ज्यामुळे इंधन महाग पडते. तसेच पेट्रोल पंपावरील मशिनमध्ये 'स्किमिंग' उपकरणाद्वारे तुमच्या कार्डचा डेटा चोरी होण्याचा धोका अधिक असतो.2 / 8क्रेडिट कार्डने एटीएममधून पैसे काढणे ही सर्वात मोठी चूक आहे, कारण त्यावर बँका २.५ ते ३ टक्के 'कॅश ॲडव्हान्स' शुल्क आकारतात. विशेष म्हणजे, यासाठी कोणताही 'ग्रेस पिरीयड' मिळत नाही आणि पैसे काढल्याच्या दिवसापासूनच व्याज आकारणी सुरू होते.3 / 8पेटीएम, फोनपे किंवा ॲमेझॉन पे सारख्या वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डने पैसे जमा केल्यास कंपन्या 'सुविधा शुल्क' आकारतात. या शुल्कावर अतिरिक्त जीएसटी द्यावा लागत असल्यामुळे छोटी रक्कम लोड करणे देखील तुमच्या खिशाला महाग पडते.4 / 8आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर तिकीट बुक करताना क्रेडिट कार्डचा वापर केल्यास पेमेंट गेटवे फी आणि त्यावर अतिरिक्त १ ते २ टक्के सेवा शुल्क आकारले जाते. त्याऐवजी यूपीआय किंवा डेबिट कार्ड वापरणे आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरते.5 / 8तुमच्यावर आधीच गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्जाचे हप्ते असतील, तर क्रेडिट कार्डवर नवीन खर्च करणे टाळा. अशा वेळी डेबिट कार्ड वापरल्यास तुम्ही बजेटवर नियंत्रण ठेवू शकता आणि अनावश्यक कर्जाचा बोजा वाढत नाही.6 / 8ज्या वेबसाइटचे URL 'HTTPS' ने सुरक्षित नाही किंवा ज्या संशयास्पद वाटतात, तिथे कार्ड डिटेल्स कधीही टाकू नका. अशा साइट्सवरून डेटा चोरी, हॅकिंग आणि आर्थिक फसवणूक होण्याचा मोठा धोका असतो, त्यामुळे नेहमी अधिकृत प्लॅटफॉर्म निवडा.7 / 8एका क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी दुसऱ्या कार्डवरून 'बॅलन्स ट्रान्सफर' करणे टाळावे. यामध्ये तुम्हाला मोठी प्रोसेसिंग फी आणि व्याजाचा दर मोजावा लागतो, ज्यामुळे तुम्ही कर्जाच्या एका विळख्यातून दुसऱ्या विळख्यात अडकता.8 / 8क्रेडिट कार्डचा चुकीच्या ठिकाणी वापर आणि वेळेवर पेमेंट न केल्यास तुमचा सिबिल स्कोअर वेगाने खाली येतो. कमी सिबिल स्कोअरमुळे भविष्यात तुम्हाला गृहकर्ज किंवा इतर कोणत्याही बँकेकडून कर्ज मिळण्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात.