1 / 10दोन दिवसांनी १ जून सुरू होणार आहे. महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच अनेक मोठे आर्थिक बदल दिसून येतील. यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमतींपासून ते क्रेडिट कार्ड नियमांपर्यंत सर्वांचा समावेश आहे.2 / 10दोन दिवसांनी जून महिना सुरू होईल. या महिन्याच्या सुरुवातीलाच काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामुळे तुमच्या खिशावर परिणाम होणार आहेत.3 / 10एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो, तर दुसरीकडे क्रेडिट कार्डशी संबंधित नियम देखील बदलणार आहेत.4 / 10महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेकांचे लक्ष एलपीजी सिलिंडरच्या किमतीत होणाऱ्या बदलावर असते. मे महिन्याच्या सुरुवातीला, तेल विपणन कंपन्यांनी १४ किलो घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती बदलल्या नव्हत्या, तर १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रति सिलिंडर १७ रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या होत्या. आता जूनच्या एक तारखेला बदल होऊ शकतात.5 / 10१ जून २०२५ रोजी होणारा दुसरा बदल हवाई प्रवाशांसाठी दिलासा किंवा महाग होऊ शकतो. तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमती तसेच एअर टर्बाइन फ्युएलच्या किमती सुधारित करतात. मे महिन्यात त्याच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या आणि जूनच्या सुरुवातीला त्यात बदल देखील दिसून येतात. याशिवाय, सीएनजी-पीएनजीच्या नवीन किमती देखील जाहीर केल्या जाऊ शकतात.6 / 10एक जूनला तिसरा मोठा बदल क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांशी संबंधित आहे. जर तुम्ही कोटक महिंद्रा बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला १ जूनपासून मोठा धक्का बसू शकतो. यामध्ये सर्वात मोठा बदल ऑटो डेबिट व्यवहारांशी संबंधित आहे.7 / 10जर या बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्याचा ऑटो डेबिट व्यवहार अयशस्वी झाला तर बँकेकडून २ टक्के बाउन्स शुल्क लागू केले जाऊ शकते. हे किमान ४५० रुपये आणि जास्तीत जास्त ५००० रुपये असू शकते.8 / 10बँकेच्या वेबसाइटनुसार, बहुतेक बँकेच्या क्रेडिट कार्डवरील मासिक वित्त शुल्क पहिल्या तारखेपासून वाढू शकते. ते सध्याच्या ३.५० टक्के (वार्षिक ४२%) दरावरून ३.७५ टक्के (वार्षिक ४५%) पर्यंत वाढवता येते.9 / 10सरकार ईपीएफओचे नवीन व्हर्जन ईपीएफओ ३.०, १ जूनला लाँच होऊ शकते. काही दिवसापूर्वीच केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे फायदे आणि बदल याबद्दल माहिती शेअर केली. ईपीएफओच्या नवीन व्हर्जनमुळे देशातील ९ कोटींहून अधिक सदस्यांना एटीएममधून पीएफ पैसे काढण्याची सुविधा मिळू शकते.10 / 10जून महिन्यात होणारा पुढील बदल आधार कार्डशी संबंधित आहे. हा बदल एक तारखेपासून नाही तर १४ जून नंतर दिसून येईल. प्रत्यक्षात, UIDAI ने आधार वापरकर्त्यांना मोफत आधार कार्ड अपडेट सुविधा प्रदान केली आहे आणि त्याची अंतिम तारीख १४ जून आहे.