शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 09:08 IST

1 / 8
मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेत पालक दिवस-रात्र विचार करत असतात. शाळेची वाढती फी आणि उच्च शिक्षणाची चिंता त्यांना सतावते. सीए नितीन कौशिक यांनी ही चिंता दूर करण्यासाठी एक उत्तम उपाय सांगितला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर एका पोस्टमध्ये एसआयपी (SIP) योजनेबद्दल माहिती दिली आहे. ही योजना तुमच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलू शकते. सोबतच, मुलाच्या २२ वर्षांचा होण्यापर्यंत तुमच्याकडे ५० लाख रुपयांहून अधिक बचत होऊ शकते.
2 / 8
यासाठी तुम्हाला मुलाच्या जन्मापासून दरमहा १०,००० रुपयांची एसआयपी सुरू करावी लागेल. ही रक्कम १० वर्षांपर्यंत दरवर्षी १०% नं वाढवावी लागेल. १० वर्षांनंतर गुंतवणूक थांबवायची आहे. त्यानंतर, मुलाच्या १० ते २२ वर्षांच्या वयापर्यंत दरमहा २५,००० रुपये काढायचे आहेत. हे सर्व कोणत्याही शैक्षणिक कर्जाशिवाय (एज्युकेशन लोन) शक्य आहे.
3 / 8
९९% पालक कोणत्याही योजनेशिवाय शाळेच्या फीवर लाखो रुपये खर्च करतात, असंही ते म्हणाले. 'काय होईल जर १० वर्षांची एसआयपी तुमच्या मुलाच्या शिक्षणाला जवळपास मोफत फंड करू शकली आणि तरीही त्यांच्या स्वप्नांसाठी लाखो रुपये शिल्लक ठेवू शकली?' असा सवालही त्यांनी केला. त्यांनी स्टेप-अप एसआयपी स्ट्रॅटेजी (Step-up SIP Strategy) सुचवली आहे. ही स्ट्रॅटेजी महागड्या एज्युकेशन लोनची जागा घेऊ शकते, कारण ती एक दीर्घ मुदतीची आर्थिक योजना आहे.
4 / 8
ही योजना अशा प्रकारे काम करते: तुमच्या मुलाचा जन्म झाल्यावर १०,००० रुपयांचा मासिक एसआयपी (SIP) सुरू करा. पुढील १० वर्षांसाठी दरवर्षी SIP रक्कम १०% नं वाढवा. १० वर्षांनंतर SIP मध्ये योगदान देणं थांबवा. तुमचं मूल १० वर्षांचे झाल्यापासून ते २२ वर्षांचे होईपर्यंत, दरमहा २५,००० रुपये काढा. ही रक्कम मुलाच्या फीसाठी वापरता येऊ शकते. या योजनेत १२% CAGR (चक्रवाढ वार्षिक वाढ दर) गृहीत धरला आहे.
5 / 8
कौशिक यांच्या गणनेनुसार, तुम्ही १० वर्षांत एकूण १९.१२ लाख रुपये गुंतवाल. तोपर्यंत ही रक्कम वाढून ३२.६९ लाख रुपये झालेली असू शकते. पुढील १२ वर्षांत, तुम्ही शिक्षणासाठी एकूण ३६ लाख रुपये काढाल, तरीही तुमच्या खात्यात ५१ लाख रुपये शिल्लक राहतील. 'तुम्ही पैसे काढता तेव्हाही चक्रवाढ व्याज काम करतं.' याचा अर्थ उर्वरित पैसे वाढतच राहतात. यामुळे पैसे काढतानाही ते वाढतच राहतील.
6 / 8
या योजनेची तुलना शैक्षणिक कर्जाशी करा. १० वर्षांसाठी ११% व्याजदरानं ३६ लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज घेतल्यास दरमहा अंदाजे ५०,००० रुपये ईएमआय येईल. एसआयपीद्वारे काढलेल्या रकमेच्या ही रक्कम दुप्पट आहे, ज्यावर व्याजाचा मोठा भार देखील आहे. कौशिक म्हणाले की ही रणनीती तुमच्या उत्पन्न वाढीशी जुळते. 'दरमहा १०,००० रुपयांपासून सुरुवात करा आणि १० व्या वर्षापर्यंत तुम्ही दरवर्षी २.८ लाख रुपये गुंतवत असाल, जे प्रमोशन आणि पगार वाढीशी सुसंगत आहे,' असंही ते म्हणाले.
7 / 8
त्यांच्याकडे काही सूचनाही आहेत. कमी किमतीच्या इंडेक्स फंडांचा वापर करा. आपत्कालीन परिस्थितीत नेहमीच काही लिक्विडीटी ठेवा. दरवर्षी तुमच्या प्रगतीचा आढावा घ्या. '१० वर्षांसाठी एक शिस्तबद्ध, स्टेप-अप एसआयपी एका दशकाच्या ओव्हरटाईमपेक्षा कितीतरी जास्त करू शकते.' हा तणावमुक्त आणि स्मार्ट कंपाउंडिंगचा (Smart Compounding) मार्ग आहे,' असा निष्कर्षही त्यांनी काढला.
8 / 8
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तीक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसा