शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Flex Fuel : आता पेट्रोलपेक्षा स्वस्त फ्लेक्स फ्युएल! नवा पर्याय, वाचेल मोठी रक्कम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 07:35 IST

1 / 5
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. अनेक ठिकाणी ११६ रुपये प्रतिलिटरपर्यंत पेट्रोलच्या किमती गेल्या आहेत तर डिझेलही ११० पर्यंत पोहोचले आहे. अशा स्थितीत पर्यायी इंधनाचा शोध अनिवार्य झाला आहे.
2 / 5
अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फ्लेक्स फ्युएलचा उल्लेख केला. येत्या सहा महिन्यांत फ्लेक्स फ्युएलवर गाड्या धावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
3 / 5
पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून फ्लेक्स फ्युएलकडे पाहिले जात आहे. गॅसोलीन आणि इथेनॉल यांच्या मिश्रणातून हे इंधन तयार केले जाते. इथेनॉल हे एक जैविक इंधन असून उसाची मळी, मका आणि अन्य टाकाऊ खाद्य पदार्थांपासून त्याची निर्मिती होते.
4 / 5
या इंधनामुळे प्रदूषण कमी होते. गॅसोलीन आणि इथेनाॉलचे मिश्रण असल्याने एक प्रकारे फ्लेक्स फ्युएल इंजिन टू-इन-वन तंत्राचे काम करते. फ्लेक्स फ्युएल इंजिन गाडीला असल्यास पेट्रोल आणि इथेनॉल अशा दोन्ही इंधनावर गाडी चालू शकते.
5 / 5
पेट्रोल आणि डिझेल यांनी शंभरी पार केलेली आहे. इथेनॉल त्या मानाने स्वस्त असेल. ६० ते ७५ रुपये प्रतिलिटर एवढ्या किमतीला इथेनॉल उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेल्या गाड्या स्वस्त असतील. तूर्तास ब्राझील, युरोप, थायलंड आणि अमेरिका या ठिकाणी फ्लेक्स फ्युएल इंजिनावरील गाड्यांचा वापर केला जातो.
टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलNitin Gadkariनितीन गडकरी