शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विकली गेली अनिल अंबानींची कंपनी, लिलावात 'या' बड्या उद्योगपतीनं लावली सर्वात मोठी बोली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 4:21 PM

1 / 7
कर्जात बुडालेली अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स नेव्हल अँड इंजिनीअरिंग लिमिटेड (RNEL) आता मुंबईचे उद्योगपती निखिल व्ही मर्चंट यांच्या नावावर होणार आहे. लिलाव प्रक्रियेत ते सर्वाधिक बोली लावण्याच्या शर्यतीत टॉपवर होते. RNEL ला प्रामुख्याने पिपावाव शिपयार्ड (Pipavav Shipyard) नावाने ओळखले जात होते.
2 / 7
सूत्रांनी बिझनेस टुडेला दिलेल्या माहितीनुसार, निखिल मर्चेंट आणि त्यांच्या पार्टनर्सच्या कन्सोर्टियम हेझेल मर्कंटाइल प्रायव्हेट लिमिटेडने (Hazel Mercantile Pvt Ltd) तिसऱ्या राउंडदरम्यान सर्वात मोठी बोली लावली.
3 / 7
कमिटी ऑफ क्रेडिटर्सने (COC) गेल्या महिन्यातच या लिलाव प्रक्रियेत सहभागी कंपन्यांशी संवाद साधून, उच्च ऑफर्सची मागणी केली होती. यानंतर, हेजल मर्कंटाइलने शिपयार्ड साठी आपली बोली सुधारणा करून 2700 कोटी रुपये एवढी केली आहे. यापूर्वी त्यांनी 2,400 कोटी रुपयांची बोली लावली होती.
4 / 7
RNEL वर 12,429 कोटी रुपयांचे कर्ज - आयडीबीआय बँक (IDBI) रिलायन्स नेव्हलची लीड बँकर आहे. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी शिपयार्डला गेल्या वर्षी जानेवारीमध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) मध्ये नेण्यात आले होते. रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंगवर सुमारे 12,429 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
5 / 7
RNEL वर 10 मोठ्या कर्जदारांपैकी स्टेट बँक ऑफ इंडियाचे 1,965 कोटी रुपयांचे कर्ज आहे, तर युनियन बँक ऑफ इंडियाचे सुमारे 1,555 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
6 / 7
तीन कंपन्यांनी लावली होती बोली - अनिल अंबानींच्या या कंपनीसाठी यापूर्वी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यांपैकी एक दुबईस्थित एनआरआय समर्थन सलेली कंपनी होती, त्यांनी केवळ 100 कोटी रुपयांची बोली लावली होती. तसेच उद्योगपती नवीन जिंदाल यांच्या कंपनीने 400 कोटींची दुसरी बोली लावली होती.
7 / 7
RNEL चे पहिले नाव रिलायन्स डिफेन्स अँड इंजिनिअरिंग लिमिटेड असे होते. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने 2015 मध्ये पिपावाव डिफेन्स अँड ऑफशोर इंजिनिअरिंग लिमिटेडचे अधिग्रहण केले. यानंतर या कंपनीचे नाव बदलून रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड (RNEL) करण्यात आले होते.
टॅग्स :Anil Ambaniअनिल अंबानीRelianceरिलायन्सbusinessव्यवसाय