Adani वर बंदी घातलेल्या बँकेचे वाजले बारा, आता भारतीयाच्या खांद्यावरच वाचवण्याची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 09:26 IST
1 / 8जगातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेली स्वित्झर्लंडची क्रेडिट सुइस (Credit Suisse) बँक बुडण्याच्या मार्गावर होती. परंतु स्विस सरकार आणि नियामक यांच्या समन्वयामुळे तिला वाचवण्यात यश आलंय. बँकेची अवस्था अशी आहे की आठ दिवसांत बँकेचे शेअर्स ७९ टक्क्यांनी घसरले आहेत.2 / 8यूएसबी बँक क्रेडिट सुइसला सुमारे ३ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करणार आहे. हा करार २०२३ च्या अखेरीस पूर्ण होईल. महिन्याभरापूर्वी जगातील मोठ्या बँकांमध्ये समाविष्ट असलेली क्रेडिट सुईस बँक आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. 3 / 8बँकेला वाचवण्याची मोठी जबाबदारी बँकेचे कार्यकारी अधिकारी दीक्षित जोशी यांच्यावर आहे. भारतीय वंशाचे दीक्षित जोशी हे क्रेडिट सुइसचे मुख्य वित्तीय अधिकारी आहेत. ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांना सीएफओ बनवण्यात आले.4 / 8दीक्षित जोशी हे भारतीय वंशाचे असून त्यांचा जन्म १९७१ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झाला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील विटवॉटरसँड विद्यापीठात शिक्षण घेतलं. त्यांनी अॅक्चुरियल सायन्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे. त्यांनी १९९२ मध्ये स्टँडर्ड बँकेतून करिअरला सुरुवात केली.5 / 8त्यांना बँकिंग क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. क्रेडिट सुईसच्या आधी त्यांनी इतर अनेक मोठ्या बँकांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ५१ वर्षीय दीक्षित हे १९९५ ते २००३ या काळात क्रेडिट सुइसशी संबंधित होते. न्यूयॉर्क आणि लंडनमधील क्रेडिट सुईसमध्ये त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.6 / 8२०२२ मध्ये, ते डेव्हिड माथर यांच्या जागी त्यांनी क्रेडिट सुइसचे CPFO म्हणून जबाबदारी स्वीकारली. याआधी ते डोएश बँकेत कोषाध्यक्ष होते. या बँकेत पाच वर्षे काम केलं. त्यांच्या कार्यकाळात बँकेची स्थिती सुधारली होती. गुंतवणूकदारांचा विश्वास बँकेवर परत आला होता.7 / 8सद्यस्थिती पाहायची झाली तर जवळपास ७९ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. क्रेडिट सुईसचा स्टॉक आता आजवरच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहे आणि २००७ मधील सर्वाधिक उच्चांकाच्या तुलनेत ९९ टक्क्यांनी खाली कोसळला आहे. दुसरीकडे यूबीएसच्या शेअर्समध्येही जवळपास १६ टक्क्यांची घसरण झाली आहे.8 / 8दुसरीकडे, २५ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये संयुक्तपणे ५२ टक्के मार्केट कॅप पाहायला मिळाला आहे. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत अदानीच्या शेअर्सचे मार्केट कॅप सुमारे १० लाख कोटी रुपयांनी खाली आले होते.