शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ट्रेडिंगमध्ये नुकसान टाळायचंय; मग हे ६ फॉर्म्युले लक्षात ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:49 IST

1 / 7
बाजारात ट्रेडिंग करताना किती नुकसान झाल्यानंतर जोखीम घेणे थांबवावे यासाठी ६ गोष्टी समजून घ्या.
2 / 7
कोणत्याही ट्रेडवर एकूण गुंतवणुकीचा २ टक्केपेक्षा अधिक तोटा होऊ देऊ नका. जर १० हजार गुंतवले असतील तर त्यावर जास्तीत जास्त २०० रुपयांपर्यंत तोटा सहन करण्यापर्यंतची जोखीम घ्या.
3 / 7
. ३-५-७ या नियमानुसार एका ट्रेडवर ३ टक्के, सर्व ट्रेडवर ५ टक्के जोखीम ठेवा. पोर्टफोलिओचा कमाल तोटा ट्रेडिंग भांडवलाच्या ७ टक्केपेक्षा जादा नसावा.
4 / 7
घसरणीवेळी नुकासानापासून वाचवण्यासाठी ऑप्शन वा फ्युचर्स सारखी साधने वापरा. शेअर्सच्या किंमत कमी होण्यापासून बचावासाठी ‘पुट ऑप्शन’ खरेदी करा.
5 / 7
स्टॉप-लॉस ऑर्डर पद्धतीने एखाद्या स्टॉकची किंमत एका स्तरावर पोहोचल्यावर विकण्यासाठी ठेवता येते. यामुळे गुंतवणुकीला संरक्षण मिळते.
6 / 7
आपत्कालीन निधी तयार ठेवा. हा निधी गुंतवणुकीच्या रकमेशिवाय इतर आवश्यक खर्चांसाठी उपयोगी पडतो.
7 / 7
जोखीम व्यवस्थापनासाठी पोर्टफोलियोमध्ये डायव्हर्सिफिकेशन करा. गुंतवणुकीचे विभाजन शेअर्स, बाँड्स, रिअल इस्टेट, सोने-चांदी अशा पर्यायांमध्ये करा.
टॅग्स :Stock Marketशेअर बाजारbusinessव्यवसायMONEYपैसा