बम्पर परतावा! कॉटन कंपनीच्या शेअरनं 10000 रुपयांचे केले 9 लाख, आता बांगलादेशातून आली मोठी ऑर्डर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 21:36 IST
1 / 7वस्त्रोद्योग क्षेत्रातील अक्षिता कॉटन (Axita Cotton) या छोट्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. आता या कंपनीला बांगलादेशातून 26.92 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर रॉ कापसाच्या पुरवठ्यासाठी मिळाली आहे.2 / 7अक्षिता कॉटनचा शेअर 3 टक्क्यांहून अधिकने वाढून 63.07 रुपयांवर बंद झाला आहे. या कंपनीला बांगलादेश स्पिनिंग मिल्सकडून नुकत्याच भारतीय रॉ कापसासाठी 22.21 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या होत्या. अशाप्रकारे कंपनीची ऑर्डर बुकिंग वाढून 49.20 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.3 / 710 हजार रुपयांचे झाले 9 लाख रुपयांहून अधिक - अक्षिता कॉटनचा शेअर 15 फेब्रुवारी 2019 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 1.98 रुपयांवर होता. त्यावेळी एखाद्याने या शेअरमध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याला 5050 शेअर्स मिळाले असते. अक्षिता कॉटनने डिसेंबर 2019 मध्ये 1:1 या प्रमाणात बोनस शेअर आणि जानेवारी 2022 मध्ये 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर दिले आहेत.4 / 7बोनस शेअर मिळाल्यानंतर आता एकूण शेअर्सची संख्या 15150 वर पोहोचली असती. अक्षिता कॉटनचा शेअर 6 एप्रिल 2023 रोजी 63.07 रुपयांवर बंद झाला. यामुळे आता या शेअर्सचे मूल्य 9.55 लाख रुपये झाले असते. (यात स्टॉक स्प्लिटचा समावेश करण्यात आलेला नाही.)5 / 7कंपनीला 3 महिन्यांतच पूर्ण करायची आहे ऑर्डर - अक्षिता कॉटनला मिळालेल्या ऑर्डरमध्ये 4 फॉरेन बायर्सचाही समावेश आहे. तसेच ही ऑर्डर पुढील तीन महिन्यांत पूर्ण करायची आहे. एका प्रसिद्ध बांगलादेशी टेक्सटाइल कंपनीनेही ऑर्डर दिली आहे. 6 / 7प्रीमियम रॉ कॉटन कुफायतशीर किमतीत उपलब्ध करून देण्याच्या चांगल्या ट्रॅक रेकॉर्डमुळे अक्षिता कॉटनला ही ऑर्डर मिळाली आहे. अक्षिता कॉटन गेल्या 6 वर्षांपासून बांगलादेश, चीन, व्हिएतनाम आणि अनेक युरोपीय देशांमध्ये रॉ कॉटन आणि आणि कॉटन यॉर्न निर्यात करते.7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)