1 / 8रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) ग्राहकांना अनेक परवडणारे प्लॅन्स ऑफर करतात. परंतु बीएसएनएल देखील यात मागे नसून या कंपन्यांना टक्कर देत आहे. 2 / 8BSNL कडे असे अनेक प्रीपेड प्लॅन आहेत, जे इतर कोणत्याही कंपन्यांकडे नाहीत. येथे आम्ही तुम्हाला BSNL च्या 200 रुपयांपेक्षा कमी स्वस्त प्रीपेड प्लॅन्सबद्दल सांगत आहोत.3 / 8या यादीतील पहिला प्लॅन 49 रुपयांचा आहे. यामध्ये तुम्हाला 24 दिवसांसाठी 100 फ्री व्हॉईस कॉलिंग मिनिटे आणि 2 जीबी डेटा मिळेल. 4 / 8दुसऱ्या प्लॅनची किंमत 99 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला फक्त 22 दिवसांची वैधता मिळेल, ज्यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. तर दुसरीकडे 135 रुपयांच्या प्लॅनमध्ये 24 दिवसांसाठी 1440 व्हॉईस कॉलिंग मिनिटे दिली जातात.5 / 8बीएसएनएल आणखी एक जबरदस्त प्लॅन ऑफर करत आहे. याची किंत 118 रुपये आहे. या प्लानमध्ये 26 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 0.5 जीबी डेटा दररोज दिला जातो. म्हणजेच तुम्हाला एकूण 13 जीबी डेटा मिळेल. 6 / 8असाच एक प्लॅन 147 रुपयांचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण 30 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 10 GB डेटा मिळतो. यात बीएसएनएल ट्यून्सचीही सुविधा आहे.7 / 8बीएसएनएलचे 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे आणखी दोन 185 आणि 187 रुपयांचे दोन प्लॅन्स आहेत. 185 रुपयांमध्ये, तुम्हाला दररोज 1 GB डेटा आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह 28 दिवसांची वैधता मिळते. 8 / 8त्याचप्रमाणे, 187 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 2 जीबी डेटा आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात. या प्लॅनची वैधता देखील 28 दिवसांची आहे. म्हणजेच तुम्हाला एकूण 56GB डेटा मिळेल.