शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

BSNL ने आणला दमदार प्लॅन; फक्त 251 रुपयांत मिळेल 251GB डेटा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 16:41 IST

1 / 6
BSNL : खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यासून सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL साठी चांगले दिवस आले आहेत. BSNL जुलै 2024 पासून फूल फॉर्ममध्ये असून, आपल्या ग्राहकांच्या योईसाठी आपले नेटवर्क मजबूत करण्याचे काम करत आहे. याशिवाय, नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन्स आणत आहे.
2 / 6
आता BSNL ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक प्लॅन सामील केला आहे. BSNL चा हा रिचार्ज अशा युजर्ससाठी आहे, ज्यांना जास्त इंटरनेटची गरज आहे किंवा ते जास्त OTT स्ट्रीमिंग करतात.
3 / 6
BSNL ने त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या यादीत रु. 251 चा एक उत्तम प्लॅन सामील केला आहे. बीएसएनएलने हा प्लॅन IPL चा हंगाम लक्षात घेऊन आणला आहे. कंपनीच्या या नव्या योजनेमुळे करोडो क्रिकेटप्रेमींना मोठा दिलासा मिळणार आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये मोबाईल डेटा प्रेमींना अनेक फायदे दिले जात आहेत.
4 / 6
BSNL चा Rs 251 प्रीपेड प्लॅन 60 दिवसांच्या दीर्घ वैधतेसह येतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 251GB हाय स्पीड डेटा मिळतोय. BSNL ने हा रिचार्ज प्लॅन मर्यादित कालावधीच्या ऑफरसह सादर केला आहे. जर तुम्हाला आयपीएल मॅचेसचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहायचे असेल, तर आता तुम्हाला डेटा पॅकसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
5 / 6
BSNL ने आपल्या नवीन रिचार्ज प्लॅनची ​​माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अधिकृतपणे पोस्ट करून दिली आहे. BSNL ने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 251 रुपयांमध्ये 251GB हाय स्पीड डेटा मिळवा आणि 60 दिवस नॉन-स्टॉप क्रिकेटचा आनंद घ्या.
6 / 6
महत्वाची बाब म्हणजे, तुम्ही हा रिचार्ज प्लॅन घ्यायचा विचार करत असाल, तर हा एक डेटा प्लॅन आहे. त्यामुळे कंपनी यात कॉलिंग किंवा एसएमएस सारख्या सेवा देत नाही. कॉलिंगसाठी तुम्हाला वेगळा रिचार्ज प्लान घ्यावा लागेल. तुम्ही हा रिचार्ज प्लॅन बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाइट किंवा बीएसएनएल सेल्फ केअर ॲपवरून मिळवू शकता.
टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)