Disney+ Hotstar च्या बेनिफिटसह 300 Mbps स्पीड, 4000GB डेटा आणि अन्य फायदे देतेय 'ही' कंपनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 21:32 IST
1 / 9ग्राहकांना निरनिराळे प्लॅन देण्यात बीएसएनएल (BSNL) ही सरकारी कंपनी इतर खासगी कंपन्यांच्या मागे नाही. कंपनीकडे कमी किमतीची असा एक खास प्लॅन आहे, ज्यामध्ये Disney + Hotstar Premium चा लाभ मिळतो. 2 / 9बीएसएनएल ही कंपनी आपल्या ग्राहकांना अनेक उत्तमोत्तम ब्रॉडबँड प्लॅन्स ऑफर करत आहे. यापूर्वी कंपनीकडे दोन हाय-एंड प्लॅन्स होते, ज्यामध्ये Disney + Hotstar प्रीमियमचा लाभ उपलब्ध होता. 3 / 9नंतर कंपनीने 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये काही बदल केले. परंतु आता कंपनीचा एकमेव ब्रॉडबँड प्लॅन जो डिस्ने प्लस हॉटस्टार प्रीमियम बेनिफिटसह येतो. चला जाणून घेऊया या प्लॅनची किंमत किती आहे आणि त्यात काय खास आहे.4 / 9BSNL सध्या फक्त 1499 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनसह Disney+ Hotstar प्रीमियमचा लाभ देत आहे. या प्लॅनमध्ये पूर्वीही OTT बेनिफिट उपलब्ध होते आणि त्याच्या फायद्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, नवीन युझर्सना पहिल्या महिन्याच्या बिलावर मोठी सूट मिळते.5 / 91499 रुपयांचा प्लॅन डाउनलोड आणि अपलोड दोन्हीसाठी 300 Mbps स्पीडसह येतो. या ब्रॉडबँड प्लॅनसह, युझर्सना 4000GB डेटा मिळतो. याशिवाय यूजर्सना फ्री फिक्स्ड लाइन व्हॉईस कॉलिंग कनेक्शन देखील मिळते.6 / 9वर नमूद केल्याप्रमाणे, या प्लॅनवरील नवीन ग्राहकांना 500 रुपयांपर्यंतच्या पहिल्या बिलावर 90 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. FUP डेटा वापरल्यानंतर इंटरनेटचा वेग 4 Mbps पर्यंत कमी केला जातो. BSNL ने 1499 रुपयांच्या प्लॅनला फायबर अल्ट्रा प्लॅन म्हटले आहे.7 / 9दरम्यान, या किंमतीत इतर कंपन्यांकडे Disney+ Hotstar Premium चा मोफत लाभ देणारा कोणतीही ब्रॉडबँड प्लॅन नाही. 8 / 9JioFiber आणि Airtel Xstream Fiber सारख्या कंपन्या Disney+ Hotstar चे फायदे देतात, परंतु हे प्रीमियम सबस्क्रिप्शन नाही. त्यामुळे जर तुम्ही या विशेष OTT लाभासह ब्रॉडबँड प्लॅन शोधत असाल, तर तो तुम्हाला BSNL भारत फायबर प्लॅनमध्ये मिळू शकते.9 / 9BSNL भारत फायबरद्वारे 749 रुपये आणि 999 रुपयांमध्येही OTT प्लॅन ऑफर केले जातात. या दोन्ही प्लॅन्समध्ये ग्राहकांना भरपूर OTT बेनिफिट्स मिळतात. परंतु Disney + Hotstar Premium सबस्क्रिप्शन उपलब्ध नाही. 1499 रुपयांच्या समान किमतीसाठी, JioFiber अनेक OTT बेनिफिट्ससह 300 Mbps चा प्लॅन ऑफर करते.