अब्जाधीशाचा मुलगा क्रिकेटरवरून बनला बिझनेसमन; ८.५ लाख कोटी रुपयांचं आहे वडिलोपार्जित साम्राज्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 10:07 IST
1 / 7अब्जाधीश उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla) यांचा मुलगा आर्यमन विक्रम बिर्ला हा क्रिकेटपटूकडून यशस्वी उद्योगपती बनला आहे. क्रिकेटमध्ये कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या आर्यमन विक्रम बिर्ला यांनी २०१७-१८ मध्ये मध्य प्रदेशकडून रणजी करंडकात पदार्पण केलं होतं. 2 / 7२०१८ मध्ये आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्सनं त्यांची निवड केली होती. २०१९ मध्ये त्यांनी आपल्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. क्रिकेटशिवाय आर्यमन बिर्लानं व्यवसायाच्या जगतात आपली नवी ओळख निर्माण केली आहे.3 / 7ग्रासिम इंडस्ट्रीज आणि आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलच्या संचालक मंडळात ते सामील झाले आहेत. त्यांनी मुंबईत 'जॉलिस' नावाचा खास क्लबही सुरू केलाय. त्यातून विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींसाठी व्यासपीठ उपलब्ध होतं. आर्यमन विक्रम बिर्ला यांना श्वानांवर अधिक प्रेम आहे. याचंच महत्त्वाचं उदाहरण म्हणजे 'द पॉवरस्टार कंपनी'. पाळीव प्राण्यांसाठी हे खास स्टोअर सुरू करण्यात आलंय.4 / 7आर्यमन विक्रम बिर्ला यांचा जन्म ९ जुलै १९९७ रोजी झाला. २०२३ मध्ये त्यांची आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. आर्यमन बिर्ला यांनी मुंबई विद्यापीठातून डिस्टन्स लर्निंगद्वारे वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. 5 / 7आर्यमन विक्रम बिर्ला यांचा आतापर्यंतचा प्रवास त्यांच्या वैविध्यपूर्ण आहे. आपल्या कुटुंबाच्या अफाट व्यावसायिक साम्राज्यात ते योगदान देत आहेत. बिर्ला समूह हा देशातील अग्रगण्य आणि जुन्या औद्योगिक घराण्यांपैकी एक आहे. या समूहाचं साम्राज्य साडेआठ लाख कोटीरुपयांहून अधिक आहे.6 / 7आर्यमन यांचे वडील कुमार मंगलम बिर्ला हे आदित्य बिर्ला समूहाचे प्रमुख आहेत. ते एक यशस्वी उद्योजकही आहेत. आदित्य बिर्ला समूह हा विविध क्षेत्रांत पसरलेला मल्टिनॅशनल ग्रूप आहे. 7 / 7कुमार मंगलम बिर्ला यांनी आदित्य बिर्ला समूहाला नव्या उंचीवर नेलंय. त्यांच्या नेतृत्वाखाली समूहानं जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला असून अनेक यशस्वी अधिग्रहण देखील केली आहेत. समूहाचे डिजिटल रूपांतर करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.