शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवसाला १५० रुपये कमावणारा तरुण कसा झाला १२२ कोटींचा मालक; सोशल मीडियाने बदललं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:40 IST

1 / 6
सध्या तुम्ही कुंभ मेळ्यातील सुंदर साध्वी, मोनालिसा किंवा व्हायरल बाबाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. सोशल मीडियाने अनेकांना रात्रीत स्टार केलं. मात्र, फक्त प्रसिद्धी मिळाली म्हणजे पैसा कमावता येतो असे नाही. इथं टिकून राहण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. नाहीतर कधीकाळी प्रचंड व्हायरल झालेले लोक आता आठवणीतही नाहीत. हे सांगण्याचं कारण म्हणजे दिल्लीतील एका मध्यमवर्गीय तरुणाने आपल्या कष्टाच्या जीवावर आपलं साम्राज्य निर्माण केलं आहे.
2 / 6
या तरुणाचं नाव आहे भुवन बाम. त्याचा आज वाढदिवस आहे. २२ जानेवारी १९९४ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या भुवन बाम याला लहानपणापासूनच गायक बनायचे होते. पण, खूप संघर्ष करूनही तो गायक होऊ शकला नाही, म्हणून तो यूट्यूबकडे वळला.
3 / 6
आपल्या संघर्षाच्या दिवसांत भुवन बाम नवी दिल्लीच्या छोट्या कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये गाणी गायचा. या कामातून तो महिन्याला कसेबसे ५ हजार रुपये कमवत होता. आज भुवनची देशातील श्रीमंत YouTubers मध्ये गणना केली जाते.
4 / 6
भुवन बामच्या 'बीबी की वाइन्स' या यूट्यूब चॅनेलवर २ कोटी ६६ लाख सबस्क्राइबर्स असून देशातील टॉप युट्यूबर्सपैकी तो एक आहे.
5 / 6
एकेकाळी दिवसाला १५० रुपये कमावणाऱ्या भुवन बामची आज १२२ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्याच्याकडे महागड्या गाड्या आहेत. YouTube व्हिडिओंव्यतिरिक्त, भुवन ब्रँड एंडोर्समेंटमधून देखील भरपूर कमाई करतो. 2018 मध्ये १ कोटी सबस्क्राइबर्स मिळवणारा भुवन बाम हा भारतातील पहिला YouTuber होता.
6 / 6
भुवन आपल्या युट्यूब चॅनेलवर पॅरोडी व्हिडीओ तयार करतो. मध्यंतरी त्याने ढिंडोरा नावाची एक वेबसिरीजही प्रसिद्ध केली. यामध्ये त्याने अनेक पात्रांची भूमिका साकारली होती.
टॅग्स :YouTubeयु ट्यूबSocial Mediaसोशल मीडियाbusinessव्यवसाय