By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 10:32 IST
1 / 8एका १० सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमुळे एका अब्जाधीश कंपनीच्या सीईओंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. न्यू यॉर्कमधील एआय कंपनी अॅस्ट्रोनॉमरचे सीईओ अँडी बायरन यांना बोस्टनजवळ झालेल्या कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये कंपनीच्या चीफ पीपल ऑफिसर क्रिस्टिन कॅबोट यांच्यासोबत 'किस कॅम'वर पकडण्यात आले होते. 2 / 8या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आणि अखेर अँडी बायरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.3 / 8व्हिडिओमध्ये बायरन आणि कॅबोट ऐकमेकांच्या मिठीत बेभान असताना कॅमेऱ्यात कैद झाले. हा व्हिडिओ व्हायरल होताच, दोघांचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या जोरदार अफवा ऑनलाइन पसरल्या. कोल्डप्लेचा मुख्य गायक क्रिस मार्टिननेही या क्षणावर भाष्य करत, ते दोघे एकतर प्रेमसंबंधात असावेत किंवा खूप लाजाळू असावेत, असे म्हटले होते. या व्हिडिओमुळे कंपनीवर प्रचंड दबाव वाढला.4 / 8शनिवारी, अॅस्ट्रोनॉमर कंपनीने अँडी बायरन यांच्या राजीनाम्याची अधिकृतपणे पुष्टी केली. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, 'अँडी बायरन यांनी राजीनामा सादर केला असून, संचालक मंडळाने तो स्वीकारला आहे.' यापूर्वी, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने बायरन यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. आणि त्यांच्याजागी एका अंतरिम सीईओची नियुक्ती केली होती.5 / 8कंपनीने हे देखील स्पष्ट केले की, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी महिला कंपनीच्या एचआर विभागाच्या उपाध्यक्षा एलिसा स्टॉडार्ड नव्हती, जसा ऑनलाइन माध्यमांमध्ये दावा केला जात होता. अॅस्ट्रोनॉमरने आपल्या नीतिमत्तेबद्दल वचनबद्धता व्यक्त करत या घटनेचा अंतर्गत आढावा सुरू केला आहे.6 / 8अँडी बायरन जुलै २०२३ पासून अॅस्ट्रोनॉमरचे सीईओ म्हणून काम करत होते. त्यांची कंपनी 'अॅस्ट्रो' या प्लॅटफॉर्मसाठी ओळखली जाते, जे Apache Airflow वापरून डेटा वर्कफ्लो व्यवस्थापित करते. तर क्रिस्टिन कॅबोट नोव्हेंबर २०२४ मध्ये अॅस्ट्रोनॉमरमध्ये चीफ पीपल ऑफिसर म्हणून रुजू झाल्या होत्या. विशेष म्हणजे, व्हायरल व्हिडिओवर दोघांनीही सार्वजनिकपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.7 / 8ज्या 'अॅस्ट्रोनॉमर' कंपनीचे अँडी बायरन सीईओ होते, ती एक मोठी कंपनी असून तिचे मूल्यांकन ११ लाख कोटी (सुमारे १३० बिलियन डॉलर) रुपये आहे. ही कंपनी इतर कंपन्यांना त्यांचा डेटा कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यास मदत करते.8 / 8व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, अँडी बायरन यांची पत्नी मेगन केरिगन बायरन यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून 'बायरन' हे आडनाव काढून टाकले आहे. इतकेच नाही, तर त्यांनी त्यांचे फेसबुक अकाउंटही डिलीट केले, ज्यामध्ये पूर्वी अनेक कुटुंबाचे फोटो होते. या घटनेमुळे बायरन यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यावरही मोठा परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.