शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अनंत अंबानींच्या हातात 22 कोटींचे घड्याळ; कंपनी कोणती? यात नेमकं काय खास? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 18:19 IST

1 / 5
Anant Ambani Richard Mille Watch : महागडी घड्याळे बनवणारी स्विस कंपनी Richard Mille पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनंत अंबानी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात ते या कंपनीचे महागडे घड्याळ RM 52-04 Skull Blue Sapphire हातात घातल्याचे दिसत आहेत. जगातील सर्वात महागड्या घड्याळांमध्ये याचा समावेश आहे. याचे कारण म्हणजे, जगात फक्त अशी तीन घड्याळे आहेत, ज्यापैकी एक अनंत अंबानी यांच्या हातात आहे. या घड्याळाची किंमत $2,625,000, म्हणजेच सुमारे 22 कोटी रुपये आहे.
2 / 5
Richard Mille ब्रँडची घड्याळे जगभरात श्रीमंतीचे प्रतीक म्हणून उदयास आली आहेत. ही कंपनी एका वर्षात फक्त 5,300 घड्याळे बनवते, ज्याची सरासरी किंमत $250,000 आहे. राफेल नदालसह जगभरातील अनेक खेळाडू, सेलिब्रिटी आणि उद्योगपती या ब्रँडची घड्याळे घालतात. या कंपनीने आपल्या आगळ्यावेगळ्या डिझाईनसाठी जगात एक वेगळी ओळख मिळवली आहे. हे टायटॅनियम आणि कार्बन फायबर सारख्या पदार्थांपासून बनवले जाते. कंपनीच्या Rm52-05 Manual Winding Tourbillon Pharrell Williams 49.94 Mm मॉडेलची किंमत तब्बल 37.71 कोटी रुपये आहे.
3 / 5
Richard Mille कंपनीने 2001 मध्ये बाजारात प्रवेश केला आणि 2022 मध्ये कमाई $1.5 अब्जपर्यंत पोहोचली. गेल्या दोन दशकांत या ब्रँडने जे यश मिळवले, ते स्विस घड्याळ उद्योगात अतुलनीय आहे. ब्रँडचे सह-संस्थापक रिचर्ड मिल यांनी 1970 च्या दशकात फ्रेंच घड्याळ निर्माता फिन्होरसोबत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुढे त्यांनी Dominique Guenat सोबत स्वतःची कंपनी स्थापन केली. 2001 मध्ये त्यांनी पहिले घड्याळ RM 001 Troubillon लॉन्च केले. त्याची किंमत $135,000 होती. किमतीमुळे घड्याळ उद्योगात खळबळ उडाली.
4 / 5
किंमत इतकी जास्त का आहे? Patek Phillippe, हे घड्याळ उद्योगातील रोल्स रॉयस मानले जाते. याचे कारण म्हणजे, त्यांच्या घड्याळांची किंमत खूप जास्त असते. पण रिचर्ड मिल्सची घड्याळे त्यापेक्षाही महाग आहेत. याबाबत मिल्स म्हणाले होते की, 'आम्ही पाटेक फिलिप किंवा अन्य कोणत्याही कंपनीशी स्पर्धा करत नाही.' आज या कंपनीची घड्याळे स्टेटस सिम्बॉल बनली आहेत. हा अब्जाधीशांचा ब्रँड मानला जातो.
5 / 5
हे घड्याळ कोणाकडे आहे? कंपनीने अनेक नामांकित खेळाडूंसोबत भागीदारी केली आहे. याची सुरुवात 2010 मध्ये स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने केली होती. याशिवाय हे घड्याळ फॉर्म्युला वन फेरारी ड्रायव्हर चार्ल्स लेक्लेर्क, गोल्फर क्रिस्टी केर आणि डायना लुना, स्कीयर ॲलेक्सिस पिंटुराल्ट आणि जोहान्स थिंगनेस बोए, शो जंपर्स कार्लोस हँक गुरेरो आणि फ्लोर गिराऊड यांच्या हातात दिसते. अमेरिकन रॅपर जे-झेड, मलेशियन अभिनेत्री मिशेल योह, अमेरिकन रेकॉर्ड निर्माता फॅरेल विलियम्स, अमेरिकन कॉमेडियन विन हार्ट, ब्रिटीश गायक आणि गीतकार एड शीरन यांनाही या कंपनीची घड्याळे घालतात.
टॅग्स :anant ambaniअनंत अंबानीMukesh Ambaniमुकेश अंबानीInvestmentगुंतवणूकJara hatkeजरा हटके