Amazon मेंबरशिप, महागड्या कार्स, FD नियमांत बदल... १ जानेवारी २०२५ पासून काय-काय बदलणार? खिशावर होणार परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 09:05 IST
1 / 9News Rules 1 January 2025 : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. १ जानेवारी २०२५ पासून अशा अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे, ज्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल. अनेक कार कंपन्यांनी किंमत वाढ जाहीर केली आहे. 2 / 9जीएसटीएननं जीएसटी पोर्टलमध्ये तीन महत्त्वाचे बदल लागू करण्याची घोषणा केली आहे. आरबीआयने एनबीएफसी आणि एचएफसीशी संबंधित एफडीच्याही नियमांमध्ये ही बदल केला आहे. जाणून घेऊ कोणते होणारेत बदल.3 / 9टेलिकॉम कंपन्यांचे नियम - टेलिकॉम कंपन्यांसाठी १ जानेवारी २०२५ पासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. नव्या वर्षापासून राईट ऑफ वे नियम लागू होणार आहे. नव्या नियमांनुसार कंपन्यांना ऑप्टिकल फायबर लाइन आणि नवीन मोबाइल टॉवर बसवण्यावर भर द्यावा लागणार आहे. या नियमाच्या अंमलबजावणीमुळे कंपन्यांना आपली सेवा सुधारण्यास मदत होईल. नव्या नियमानुसार टेलिकॉम कंपन्यांना मोबाइल टॉवर बसवण्यासाठी जास्त कसरत करावी लागणार नाही.4 / 9Amazon Prime : अॅमेझॉन भारतातील प्राइम मेंबरशिप नियमांमध्ये बदल करत आहे, जे १ जानेवारी २०२५ पासून लागू होणारेत. नव्या नियमांनुसार, प्राईम व्हिडीओ आता एका अकाऊंटसह एकाच वेळी केवळ दोन डिव्हाईसेसवर स्ट्रीम करता येणार आहे. जर एखादा युजर दोनपेक्षा जास्त टीव्हीवर प्राइम व्हिडीओ पाहत असेल तर त्याला तिसऱ्या डिव्हाईससाठी स्वतंत्रपणे सब्सक्राइब करावं लागेल. प्राइम मेंबर्स सध्या पाच डिव्हाइसवर प्राइम व्हिडिओ पाहू शकतात, परंतु डिव्हाइस प्रकारावर कोणतंही बंधन नाही.5 / 9जीएसटी पोर्टल - वस्तू व सेवा कर नेटवर्कने (GSTN) जीएसटी पोर्टलमध्ये तीन महत्त्वाचे बदल लागू करण्याची घोषणा केली आहे. हे सर्व बदल १ जानेवारी २०२५ पासून लागू होतील. यातील दोन बदल ई-वे बिल निर्मितीची मुदत वाढविणं आणि वैधतेशी संबंधित आहेत. त्यापैकी एक जीएसटी पोर्टलवर सुरक्षित एन्ट्रीशी संबंधित आहे. याचं पालन न केल्यास खरेदीदार, विक्रेते, वाहतूकदार या सर्वांचं नुकसान होणार आहे.6 / 9एफडीशी संबंधित नियम - आरबीआयने एनबीएफसी आणि एचएफसीमधील फिक्स्ड डिपॉझिटशी संबंधित नियमांमध्ये बदल केला आहे. हे नियम १ जानेवारी २०२५ पासून लागू होतील. नव्या नियमांमध्ये लोकांकडून ठेवी स्वीकारणं, ठराविक टक्के लिक्विड मालमत्ता ठेवणं, जनतेच्या संपूर्ण ठेवींचा विमा उतरविणं आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवी परत करणं यांचा समावेश आहे.7 / 9कार खरेदी महागणार - नव्या वर्षात कार खरेदी करणं महागात पडणार आहे. अनेक कार कंपन्यांनी वाढत्या किंमतीचं कारण देत १ जानेवारी २०२५ पासून दरवाढीची घोषणा केली आहे. यामध्ये मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, जेएसडब्ल्यू एमजी, होंडा, मर्सिडीज-बेंझ, ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे. यातील बहुतांश कंपन्यांनी ३ टक्के दरवाढ जाहीर केली आहे.8 / 9एलपीजी सिलिंडर - इंधन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी दरांचा आढावा घेतात. गेल्या सलग पाच महिन्यांपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून घरगुती १४.२ किलोच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत सध्या या सिलिंडरची किंमत ८०३.०० रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सध्या ७३.५८ डॉलर प्रति बॅरल आहेत.9 / 9थायलंड ई व्हिसा - थायलंड १ जानेवारी २०२५ पासून ई व्हिसा प्रणाली सुरू करणार आहे. www.thaievisa.go.th या अधिकृत वेबसाइटद्वारे ई व्हिसासाठी अर्ज करता येईल. थायलंडमध्ये जाणाऱ्या भारतीयांची संख्या अधिक आहे. त्यामुळे भारतीयांनाही या सुविधेचा फायदा होणार आहे.