Adani चाच बोलबाला! ऐतिहासिक कामगिरीनंतर ‘या’ कंपनीने केला नवा विक्रम; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 15:41 IST
1 / 9कोरोना संकटाचा संपूर्ण देशाला चांगलाच तडाखा दिला आहे. या संकटाच्या कालावधीत भारतातील अनेक उद्योगांना घरघर लागली. लाखो नोकऱ्या गेल्या. मात्र, या कालावधीत गौतम अदानी यांच्या Adani ग्रुपला जबरदस्त फायदा झाल्याचे पाहायला मिळाले. 2 / 9यातच देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या अदानी समूहातील नवखी कंपनी असलेल्या Adani Wilmar ने अल्पावधीतच ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अदानी विल्मरचा शेअर ८०० रुपयांवर गेला. या शेअरचे बाजार भांडवल एक लाख कोटी रुपयांवर गेले आहे.3 / 9गौतम अदानी यांच्या संपत्तीबरोबरच त्यांच्या समूहात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची देखील संपत्ती भरमसाठ वाढत आहे. Adani Wilmar या कंपनीच्या शेअरने मागील अडीच महिन्यात गुंतवणूकदारांना २०० टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे. 4 / 9Adani Wilmar चा शेअर ५ टक्क्यांनी वधारला आणि त्याने ८०० रुपयांचा टप्पा ओलांडला. या तेजीने कंपनीचे बाजार भांडवल १ लाख ४ हजार २३४ कोटी रुपये इतके वाढले आहे. हा शेअर सार्वकालीन उच्चांकावर ट्रेड करत आहे. अदानी विल्मर कंपनीची फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत खाद्य तेल, आटा, मैदा यासारखे उत्पादने आहेत.5 / 9Adani Wilmar सध्या ८०२.८० रुपयांवर असून त्यात ३८.२० रुपयांची वाढ झाली आहे. मागील एक महिन्यात अदानी विल्मरचा शेअर तब्बल ८० टक्क्यांनी वधारला आहे. रशिया-युक्रेनमध्ये युद्धाला तोंड फुटल्यानंतर अदानी विल्मरच्या शेअरची मागणीत मोठी वाढ झालेली आहे.6 / 9फेब्रुवारी २०२२ मध्ये अदानी विल्मरने शेअर बाजारात केला होता प्रवेश अदानी विल्मरने आयपीओसाठी प्रती शेअर २३० रुपये किंमत ठेवली होती. मात्र प्रत्यक्षात ८ फेब्रुवारी २०२२ रोजी अदानी विल्मरची २२१ रुपयांना नोंदणी झाली. 7 / 9मुंबई शेअर बाजारच्या मंचावर इश्यू प्राईसच्या तुलनेत तो ३.९ टक्के कमी दराने सूचीबद्ध झाला होता. मात्र त्यानंतर एक दोन अपवाद वगळले तर या शेअरने घोडदौड कायम ठेवली आहे.8 / 9गौतम अदानी यांच्या संपत्तीत दोन वर्षात तब्बल १४ पटीने वाढ झाली आहे. फोर्ब्स या संस्थेनुसार २२ एप्रिल २०२२ पर्यंत गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १२३.७ अब्ज डाॅलर इतकी वाढली आहे. 9 / 9फोर्ब्सच्या श्रीमंत उद्योजकांच्या यादीत गौतम अदानी आता पाचव्या स्थानावर विराजमान झाले आहेत. त्यांनी वॉरेन बफे यांना मागे टाकले.