1 / 7Aadhaar Card in Regional Language: आजच्या काळात प्रत्येक भारतीयासाठी आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. कोणतेही सरकारी आणि बँकिंग काम पूर्ण करण्यासाठी तसेच मुलांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आधार कार्ड आपल्या सर्वांसाठी खूप उपयुक्त ठरते. 2 / 7भारतात विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. अनेक वेळा लोकांना दुसरी भाषा वाचणे किंवा समजणे कठीण जाते. आधार कार्डावरील नाव अनेकदा इंग्रजी किंवा हिंदी भाषेत लिहिलेले असते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड प्रादेशिक भाषेत अपडेट करायचे असेल, तर ते करणे अगदी सहजरित्या शक्य आहे.3 / 7युआयडीएआयकडून सर्वांना आधार कार्ड आपल्या स्थानिक भाषेत अपडेट करम्याची सुविधा देण्यात आली आहे. पाहुया कशाप्रकारे तुम्हाला आपल्या स्थानिक भाषेमध्ये आधार कार्ड अपडेट करता येईल.4 / 7जर तुम्हाला आपल्या स्थानिक भाषेत आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर पहिल्यांदा युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटला https://uidai.gov.in/ भेट द्या. त्यानंतर त्या ठिकाणी असलेला Aadhaar Service Section हा पर्याय निवडा.5 / 7या ठिकाणी तुम्हाला तुमचा १२ अंकी आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर पुढे कॅप्चा कोड टाकून तुम्हाला विचारण्यात आलेली माहिती भरा. माहिती भरल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. ते टाकून Update Data Button वर क्लिक करा.6 / 7यानंतर तुम्हाला ज्या भाषेत आधार अपडेट करायचं आहे, त्या रिजनल भाषेचा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला त्याठिकामी इंग्रजी व्यतिरिक्त मराठी, हिंदी, गुजराती अशा अनेक स्थानिक भाषा दिसतील. भाषेचा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर वेबसाईटवर त्याच भाषेत डिटेल्स दिसू लागतील.7 / 7ही प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही सहजरित्या आपलं आधार कार्ड स्थानिक भाषेतून अपडेट करू शकता. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे समस्यांचा सामना करावा लागणार नाही. ही प्रक्रिया अतिशय सोपी असून सहजरित्या करणं शक्य आहे.