शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 14:04 IST

1 / 7
लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. याच बरोबर, सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरातही वाढ होताना दिसत आहे. आज 24 कॅरेट सोने 866 रुपयांनी महागले आणि 74605 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडले. तर आज चांदीच्या दरातही 1844 रुपयांची वाढ झाली आहे.
2 / 7
या महिन्यात सोने 5076 रुपयांनी तर चांदी 9393 रुपयांनी स्वस्त झाली आहे. 30 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव 79681 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 98340 रुपये प्रति किलो होता. हा दर IBA चा आहे, ज्यात GST समाविष्ट नाही. आज चांदी 88904 रुपये प्रति किलो दराने खुली झाली.
3 / 7
14 ते 23 कॅरेट सोन्याचा दर - आज सोमवारी (18 नोव्हेंबर) 23 कॅरेट सोन्याचा दर सरासरी 862 रुपयांनी वधारून 74306 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 793 रुपयांनी वाढून 68338 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला.
4 / 7
याशिवाय, 18 कॅरेट सोन्याचा दर आज प्रति 10 ग्रॅम 650 रुपयांनी वाढून 55954 रुपये प्रति 10 ग्रॅमवर खुला झाला. तर 14 कॅरेट सोन्याचा भाव आज 507 रुपयांनी वाढून 43644 रुपये प्रति 10 ग्रॅमवर खुला झाला.
5 / 7
जीएसटीसह असा आहे गोल्ड-सिल्व्हरचा रेट - आता, 24 कॅरेट सोन्याचा दर GST सह 76843 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. यात 2238 रुपये एवढा जीएसटी सामील आहे. जीएसटीसह 23 कॅरेट सोन्याच्या किंमतीचा विचार करता, ते 76535 रुपयांवर पोहोचले आहे. यात 3% GST नुसार 2229 रुपयांची भर पडली आहे.
6 / 7
22 कॅरेट सोन्याचा दरही जीएसटीसह 70388 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. यात 2050 रुपयाच्या जीएसटीचा समावेश करण्यात आला आहे. चांदीचा विचार करता, एक किलो चांदीचा भाव जीएसटीसह 91615 रुपयांवर पोहोचला आहे.
7 / 7
22 कॅरेट सोन्याचा दरही जीएसटीसह 70388 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. यात 2050 रुपयाच्या जीएसटीचा समावेश करण्यात आला आहे. चांदीचा विचार करता, एक किलो चांदीचा भाव जीएसटीसह 91615 रुपयांवर पोहोचला आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीMarketबाजार