7th Pay Commission: मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देणार खुशखबर! फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठी अपडेट, जाणून घ्या किती वाढणार पगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 10:05 IST
1 / 9मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि महागाई भत्ता संदर्भात काही दिवसापूर्वीच नोटीफीकेशन जारी केली आहे. या वर्षी महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केली ही वाढ जानेवारीपासून लागू केली आहे.2 / 9यासोबतच पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना आता ४२ टक्के महागाई सवलत आणि महागाई भत्ता मिळणार आहे, जो पूर्वी ३८ टक्के होता. आगामी काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर संदर्भात एक मोठी भेट मिळू शकते. त्यात पुढील वर्षी वाढ करण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाऊ शकतो.3 / 9२०२४ मध्ये होणार्या निवडणुका जवळ आल्या असतानाच याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सरकारी कर्मचार्यांच्या फिटमेंट फॅक्टर संदर्भात सरकारने त्याचा आढावा घेण्याचे ठरवले आहे. आढावा घेतल्यानंतर पुढील वर्षी कर्मचाऱ्यांना याबाबतही चांगली बातमी मिळू शकते. या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार आहे. २०२३ मध्ये फिटमेंट फॅक्टरमध्ये कोणताही बदल होणार नाही.4 / 9२०२४ मध्ये परिक्षणाच्या आधारे त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याचा विचार खर्च विभागाकडून केला जाईल. पुनरावलोकनाच्या आधारे दिलेल्या शिफारशी वित्त मंत्रालयाकडे पाठवता येतील.5 / 9पुढील वर्षी नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेच्यावेळी फिटमेंट फॅक्टरवर निर्णय घेतला जाऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार पगारवाढीचा निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.6 / 9फिटनेस फॅक्टरच्या आधारावरच कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारामध्ये वाढ होत असते. ७ व्या आयोगाच्या शिफारशीनुसार, वेतन भत्त्यांव्यतिरिक्त, केंद्रीय कर्मचार्यांचा पगार फक्त मूळ वेतनातील फिटमेंट घटकाने वाढतो.7 / 9यापूर्वी फिटमेंट फॅक्टर वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार अडीच पटीने वाढले होते. आता कर्मचारी पुन्हा फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत. मूळ पगार आणि एकूण पगार वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.8 / 9सध्या सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर २.५७ आहे. यात बदल झाल्यास संपूर्ण पगारात बदल होणार आहे. ३.६८ पर्यंत वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. 9 / 9सध्या, फिटमेंट फॅक्टरच्या २.५७ पट आणि मूळ वेतन १८००० रुपये, इतर भत्ते वगळून, १८,००० X २.५७= ४६२६० पण जर ते ३.६८ पर्यंत वाढवले तर इतर भत्ते वगळून कर्मचाऱ्यांचे वेतन २६,००० X ३.६८ = ९५६८० रुपये होईल.