Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 08:54 IST
1 / 9Investment Tips For Working Women: जर तुम्ही कमवत असाल आणि तुमची कष्टाची कमाई केवळ खर्च न होता भविष्याला भक्कम आधार देणारी ठरावी असे वाटत असेल, तर योग्य गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या नोकरी करणाऱ्या महिलांसाठी गुंतवणूक हा केवळ एक पर्याय नसून ती काळाची गरज बनली आहे. 2 / 9योग्य ठिकाणी गुंतवलेला पैसा कठीण काळात आधार देतो आणि दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करतो. आपल्या पोर्टफोलिओमध्ये काही स्मार्ट आणि संतुलित पर्यायांचा समावेश करून तुम्ही महागाई, आपत्कालिन परिस्थिती आणि निवृत्ती या तिन्ही चिंतांपासून मुक्त होऊ शकता. २०२६ मध्ये महिलांसाठी उपलब्ध असलेल्या काही गुंतवणुकीच्या पर्यायांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.3 / 9पीपीएफ: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) हा महिलांसाठी एक सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे. यासाठी लॉक-इन कालावधी १५ वर्षांचा आहे. तर यामध्ये किमान गुंतवणूक फक्त ₹५०० इतकी करावी लागते. तसंच या स्कीममध्ये हमी परतावा मिळतो. याशिवाय यात कलम ८०सी अंतर्गत कर सूट मिळत असून त्यातीन मॅच्युरिटीनंतर त्यातील गुंतवणूक प्रत्येकी ५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवता येते.4 / 9म्युच्युअल फंड: म्युच्युअल फंड महिलांना इक्विटी, कर्ज आणि हायब्रिड पर्यायांद्वारे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याची संधी देतात. एसआयपीद्वारे लहान रकमेची गुंतवणूक करता येते. तसंच यात ध्येय-आधारित गुंतवणूक करता येते. याशिवाय ही नवीन आणि अनुभवी गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे. नियमित एसआयपी गुंतवणूक गुंतवणूकीची सवय निर्माण करण्यास आणि दीर्घकालीन भरीव निधी तयार करण्यास मदत करते. 5 / 9एनपीएस: निवृत्ती नियोजनासाठी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये इक्विटी, कॉर्पोरेट बाँड आणि सरकारी सिक्युरिटीजचा पर्याय असतो. तसंच कलम ८० सीसीडी अंतर्गत कर लाभ मिळतो. तसंच आपत्कालीन परिस्थितीत आंशिक पैसे काढू शकता. याशिवाय मॅच्युरिटीच्या वेळी एकरकमी आणि पेन्शन तरतूद असून ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे जी वाढ आणि सुरक्षिततेमध्ये संतुलन राखते.6 / 9युलिप: युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (युलिप) विमा आणि गुंतवणूक एकत्रित करतात. यात ५ वर्षांचा लॉक-इन असतो. तसंच इक्विटी, कर्ज आणि बॅलन्स्ड फंडांची निवड, परिपक्वतेवर कर सूट आणि गंभीर आजारासारख्या रायडर्सचा पर्याय असतो. 7 / 9सोन्यातील गुंतवणूक: सोनं ही नेहमीच महिलांसाठी एक आवडती गुंतवणूक राहिली आहे. याशिवाय यात गोल्ड बॉन्ड्स, गोल्ड ईटीएफ, डिजिटल गोल्ड असेही पर्याय मिळतात. हे महागाई आणि चलनातील चढउतारांपासून संरक्षण प्रदान करतं. १० वर्षांच्या किंवा त्याहून अधिक कालावधीच्या गुंतवणूक योजनांसाठी, सोने पोर्टफोलिओला संतुलन प्रदान करते.8 / 9मुदत ठेव मासिक उत्पन्न : तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कितीही कॉर्पस-बिल्डिंग योजना असल्या तरी, एफडीचं स्वतःचं स्थान असतं. जेव्हा तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत पैशांची आवश्यकता असते तेव्हा एफडी सहज उपलब्ध होतात. शिवाय, एफडी निश्चित परतावा देतात. म्हणून, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एफडीचा समावेश केला पाहिजे.9 / 9(टीप -यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)