१००% सेफ आणि ०% रिस्क वाली 'ही' गॅरंटीड स्कीम करेल तुमचा पैसा दुप्पट; ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 08:55 IST
1 / 8Investment Tips : भविष्याच्या दृष्टीनं हल्ली अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. परंतु अनेकांना आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी असं वाटत असतं. अशातच कुठे गुंतवणूक करावी असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. 2 / 8आजच्या काळात शेअर बाजारापासून ते सर्व सरकारी योजनांपर्यंत गुंतवणुकीचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. ज्यांना दमदार परतावा मिळवायचा असतो आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत, ते बाजारात आपले नशीब आजमावतात. त्याचबरोबर काही गुंतवणूकदार असेही असतात ज्यांना तुलनेनं कमी परतावा मिळाला तरी चालतो. पण आपली गुंतवणूक कोणत्याही जोखमीत घालू इच्छित नाहीत.3 / 8अशा गुंतवणुकदारांसाठी सरकार सर्व योजना १०० टक्के सुरक्षिततेसह चालवते. आपण बँक आणि पोस्ट ऑफिस दोन्ही ठिकाणी ०% जोखीम असलेल्या या योजनांचे पर्याय शोधू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका पोस्ट ऑफिस स्कीमबद्दल सांगणार आहोत जी तुमची रक्कम दुप्पट करण्याची हमी देते.4 / 8किसान विकास पत्र योजना कोणत्याही गुंतवणूकदाराला ११५ महिन्यांत (९ वर्षे, ७ महिने) गुंतवणूक दुप्पट करण्याची हमी देते. सध्या या योजनेवर ७.५ टक्के दरानं व्याज मिळत आहे. व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जाते.5 / 8एखादी व्यक्ती १००० रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकते आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. याशिवाय या योजनेअंतर्गत कितीही खाती उघडता येतात. खातं उघडताना आधार कार्ड, वयाचा दाखला, पासपोर्ट साइज फोटो, केव्हीपी अॅप्लिकेशन फॉर्म आदी कागदपत्रांची आवश्यकता भासते.6 / 8किसान विकास पत्र स्कीममध्ये कोणतीही प्रौढ व्यक्ती सिंगल किंवा जॉईंट खातं उघडू शकते. याशिवाय १० वर्षांवरील मूल आपल्या नावे किसान विकास पत्र घेऊ शकते. पालक अल्पवयीन मुलांच्या वतीनं खातं उघडू शकतात. अनिवासी भारतीयांना या योजनेत गुंतवणूक करता येत नाही.7 / 8सध्याच्या व्याजदरानुसार, जर तुम्ही आज या योजनेत ५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला पुढील ११५ महिन्यांत म्हणजे ९ वर्षे आणि ७ महिन्यांत १० लाख रुपये परत मिळतील. म्हणजे तुम्हाला थेट व्याजातून ५ लाख रुपये मिळतील. जर तुम्ही या योजनेत एकरकमी ४ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला ११५ महिन्यांत ८ लाख रुपये परत मिळतील. चांगली गोष्ट म्हणजे या योजनेत तुम्हाला चक्रवाढ व्याजाचाही लाभ मिळतो. म्हणजे तुम्हाला व्याजावरही व्याज मिळते.8 / 8किसान विकास पत्र योजनेतून मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला कर भरावा लागेल. या योजनेचं व्याज करपात्र उत्पन्नाच्या अंतर्गत येतं. तसंच आयटीआर फाइल करताना तुम्हाला ते 'Income from other sources' अंतर्गत दाखवावं लागेल.