बाबो!! लोकांच्या लग्नात नाचण्यासाठी हे सेलिब्रिटी किती मानधन घेतात माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 04:35 PM2022-04-11T16:35:00+5:302022-04-11T16:53:15+5:30

Bollywood Stars : बॉलिवूड सेलेब्रिटींबद्दल सर्व सामान्य लोकांमध्ये एक वेगळंच आकर्षण असतं आणि सेलिब्रिटी हेच ‘कॅश’ करतात. अनेक सेलिब्रिटी अनेकांच्या लग्नसोहळ्यात, सार्वजनिक कार्यक्रमात, उद्घाटन सोहळ्यात हजेरी लावताना दिसतात. साहजिकचं यासाठी सेलेब्रिटी तगडी रक्कम वसूल करतात.

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खानची क्रेझ अद्यापही कायम आहे. त्याच्या रोमँटिक अंदाजावर अनेक मुली फिदा आहेत. शाहरुख सुरुवातीपासूनच अनेक उद्योगजकांच्या, नेत्यांच्या आणि दिग्गज लोकांच्या लग्नात डान्स परफॉर्मन्स देत आला आहे. शाहरुख खान कोणाच्याही लग्नात किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डान्स करण्यासाठी तब्ब्ल 3 कोटी रुपये घेतो.

बॉलीवूडचा ‘दबंग’ सलमान खान अनेकदा कोणाच्या तरी लग्नात डान्स करताना बघायला मिळतो. सार्वजनिक कार्यक्रमात वा उद्घाटन सोहळ्यात हजेरी लावताना दिसतो. पण फुकटात नाही हो! सलमान खान सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्नात डान्स करण्यासाठी तब्ब्ल 2-3 कोटी रुपये घेतो.

नुकतीच कतरिना कैफ विकी कौशलसोबत विवाहबंधनात अडकली. त्याआधी कित्येक वेळा कतरिना कैफ अनेकांच्या लग्नात खास डान्स परफॉर्मन्स देताना दिसली. लग्नामध्ये डान्स करण्यासाठी कतरिना कैफ जवळपास 3.5 कोटी रुपये घेते.

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार सर्वाधिक सार्वजनिक कार्यक्रम वा लग्नात डान्स परफॉर्मन्स देताना दिसतो. एका लग्नात डान्स करण्यासाठी अक्षय कुमार 2.5 कोटी रुपये घेतो.

बॉलिवूडपासून हॉलिवूड गाजवणारी प्रियंका चोप्रा हिने अनेकांच्या लग्नात डान्स परफॉर्मन्स दिले आहेत. ती एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी आणि लग्नात डान्स करण्यासाठी तब्ब्ल 2.5 कोटी रुपये घेते.

रणबीर कपूरची तरूणाईत मोठी क्रेझ आहे. तो सुद्धा अशा इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी 2 कोटी रूपये घेतो.

हृतिक रोशन हा सुद्धा सार्वजनिक कार्यक्रम वा लग्नसोहळ्यांना हजेरी लावतो. यासाठी 2.50 कोटी चार्ज करतो.

रणवीर सिंग त्याच्या पॉवरपॅक्ड परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. तो अशा इव्हेंटमध्ये परफॉर्म करण्यासाठी 1 कोटी फी घेतो.