विकी- कतरिनाच्या लग्नात लाखोवारी पैशांची उधळणं; एका दिवसासाठी मोजणार तब्बल इतके रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 02:26 PM2021-11-30T14:26:29+5:302021-11-30T14:40:07+5:30

katrina kaif -vicky kaushal: राजा मानसिंह व राणी पद्मावती हे आलिशान Suite विकी-कतरिनासाठी बूक करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.

२०२१ या वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात ही जोडी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या या दोघांच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे.

विक-कतरिनाच्या लग्नाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरु असून यात दररोज त्यांच्या लग्नाविषयी वेगवेगळे अपडेट्स समोर येत आहेत. यामध्येच आता त्यांच्या लग्नसोहळ्यातील वेन्यूची चर्चा रंगली आहे.

विकी-कतरिना राजेशाही थाटात लग्न करणार असून या लग्नात ते लाखोवारी पैशांची उधळण करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर एका दिवसासाठी ते अमाप पैसे खर्च करणार आहेत.

बॉलिवूडच्या या क्यूट कपलचं लग्न राजस्थानमधील सवाई माधोपुर येथे होणार आहे. विशेष म्हणजे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा रंगणार आहे.

विकी-कतरिना यांच्यासाठी लग्नापूर्वी राजा मानसिंह व राणी पद्मावती या दोन Suite बूक करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या हॉटेलचं एका दिवसाचं भाडं ऐकून अनेक जण थक्क झाले आहेत.

विकी-कतरिनाने त्यांच्या लग्नातील प्रत्येक सोहळ्याची अरेंजमेंट करण्याची जबाबदारी डेको इव्हेंट कंपनीला दिली आहे.

राजा मानसिंह व राणी पद्मावती हे आलिशान Suite विकी-कतरिनासाठी बूक करण्यात आले आहेत. या Suite चं एका दिवसाचं भाडं ७ लाख रुपये इतकं आहे.

या हॉटेलमध्ये चार लाखांचे १४ Suite असून अन्य रुम्सचं एका दिवसाचं भाडं १ लाख रुपये आहे. या रुममध्ये गार्डन, स्विमिंग पूल जोडलेला आहे.

विकी- कतरिना राहत असलेल्या रुम्समधून अरवली पर्वत दिसतो. विकी-कतरिना येथे राहणार असल्यामुळे हॉटेलच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

विकी-कतरिना ६ डिसेंबर रोजी या हॉटेलमध्ये चेक इन करणार आहेत. तर ११ डिसेंबरला चेक आऊट करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

या लग्नाची जबाबदारी ६ वेगवेगळ्या वेंडर्सला सोपवण्यात आली आहे. यात फ्लॉवर, डेकोरेटिव, सिक्योरिटी, ट्रांसपोर्टेशन, फूड आणि जंगल सफारी यांची सोय केली जाणार आहे. ७ डिसेंबरला या जोडीचा संगीत सोहळा रंगणार आहे. तर ८ डिसेंबरला मेहंदी सोहळा होणार आहे.