ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भंडाऱ्यात दुसऱ्या दिवशीही गारपीट, बळीराजा चिंताग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 19:18 IST
1 / 8विदर्भातील काही जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसासह गारपीटीचा तडाखा बसला आहे. यामुळे रब्बी पिकासह बागायती पिकांचे अतोनात नुकसान. 2 / 8मंगळवारी झालेल्या गारपिटीची तालुका महसूल विभागामार्फत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्वाधिक गारपिट पवनी तालुक्यात झाल्याची माहिती आहे. 3 / 8विदर्भातील अनेक जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून पाऊस येत असल्याने वातावरणात गारवा अधिकच वाढल्याने थंडीतही वाढ झाली आहे.4 / 8भंडारा जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसासह गारपीटीचा तडाखा बसला असून रब्बी पिकांसह बागायती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 5 / 8आजही पावसाने जिल्ह्याला झोडपले असून अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. लाखांदूर तालुक्यात ११४.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. 6 / 8गारपिटीसह पावसाने रब्बी पिकाचे व बागायत शेतीचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे मळणी केलेले धान, पिकांचे पोते पावसात सापडले. 7 / 8भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील मोहाडी शहर, उसर्रा, लोहारा, गायमुख, सोरणा, जांब व कांद्री, वरठी परिसरातही गारांसह पाऊस बरसला. या पावसामुळे टमाटर, मिरची, कोबी पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाचा गहू पिकाला फायदा होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 8 / 8अवकाळी पावसाने झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला असून शेतात, घरासमोर आणि घरावरील पत्र्यांवरही गारा दिसून येत आहे