शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Year 2022 Horoscope: आगामी वर्ष २०२२ 'या' सहा राशींसाठी सर्वार्थाने भाग्योदयाचे ठरेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 14:39 IST

1 / 6
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष उत्तम राहील. आगामी वर्ष करिअरसाठी प्रगतीपथावर नेणारे आणि मोठा हुद्दा देणारे ठरेल. उत्पन्नही मोठ्या प्रमाणात वाढेल. धन-संपत्ती वाढेल. आर्थिक स्थिरता लाभल्यामुळे तुम्हाला नवीन क्षेत्रात नशीब आजमावण्याची प्रेरणा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. पुढील वर्ष छान आनंदात आणि ऐषोआरामत जाणार आहे. मात्र तुम्ही प्रयत्नात कसूर करू नका.
2 / 6
नवीन वर्ष सिंह राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. या वर्षात सिंह राशीच्या लोकांना प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. या संधी गमावू नका, कारण या संधीच्या जोरावर तुम्ही दीर्घकाळाच्या यशाची तरतूद करू शकाल.
3 / 6
नवीन वर्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनेक शुभवार्ता घेऊन येत आहे. हे वर्ष तुमच्या अनेक इच्छा पूर्ण करणारे ठरेल. सर्व काही तुमच्या मनासारखे होईल. तुमचे प्रयत्न सुरू ठेवा आणि आळस करू नका.
4 / 6
२०२२ हे वर्ष तूळ राशीच्या लोकांना चांगले यश देईल. करिअर-पैशाच्या बाबतीत भरपूर फायदा होईल. जोडीदाराची साथ चांगली राहील. मोठी संधी मिळू शकेल. अनेक अडलेली कामे मार्गी लागतील. शुभवार्ता कळतील.
5 / 6
मकर राशींच्या खडतर आयुष्याला आगामी वर्षात चांगलीच कलाटणी मिळणार आहे. पैसा, प्रसिद्धी, यश आणि अनेक आनंदवार्तांनी सबंध वर्ष आनंदात जाईल. ईश्वर चिंतन सुरू ठेवून प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे करा, निश्चित यश मिळेल.
6 / 6
हे नवीन वर्ष कुंभ राशीच्या लोकांचे जीवन बदलून टाकेल. ज्या काही समस्या होत्या त्या आता एक एक करून सुटायला सुरुवात होईल. अखेर, आयुष्य पुन्हा रुळावर येईल. जीवनात प्रेमाचा प्रवेश होईल. काही लोकांचे लग्नही होऊ शकते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष