शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मृत्यूनंतर माणसाचे काय होते? आत्मा सात जगांच्या प्रवासाला निघतो...; ऑक्सफर्डच्या फिलॉसॉफरने सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 17:00 IST

1 / 9
अनेक पुराणांमध्ये मृत्यूनंतर कित्येक कोटी वर्षे अनेक योनीतून जावे लागते. सर्व भोग भोगावे लागतात आणि नंतर पुनर्जन्म मिळतो, असे सांगितले जाते. परंतू, कोणालाचा माहिती नाहीय की मृत्यूनंतर आपले काय होते. शरीराला दफन केले जाते, जाळले जाते. परंतू, आतील आत्म्याचे काय होते, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. यावर ऑक्सफर्डच्या फिलॉसॉफरने माहिती दिली आहे.
2 / 9
मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीचे काय होते हे अजूनही एक गूढ रहस्यच आहे. ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेतलेले तत्वज्ञानी ख्रिस कार्टर यांनी म्हटलेय की मृत्यूनंतर आपली चेतना जिवंत राहते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. 'द केस फॉर द आफ्टरलाइफ' मध्ये त्यांनी मृत्युनंतरच्या जीवनाबद्दल माहिती दिली आहे. आता या गोष्टी खऱ्या असतील असे नाही, कारण म्हणतात ना स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
3 / 9
कार्टर यांनी सात लोकींचा प्रवासावर भाष्य केले आहे. यामध्ये त्यांनी ९ व्या शतकातील प्रसिद्ध कवी आणि मानसशास्त्रीय संशोधक फ्रेडरिक मायर्स यांचा उल्लेख केला आहे. मायर्स यांनी ज्या लोकांना आत्मा दिसतो किंवा ते आत्म्याशी बोलू शकतात अशा सायकिक लोकांशी संपर्क साधला होता. यात त्यांनी २० वर्षे जुन्या आत्म्यांबाबत विचारणा केली होती.
4 / 9
मृत्यूनंतर आत्मा पृथ्वीवरून प्रवासाला निघतो. या प्रवासात हा आत्मा एकूण सात वेगवेगळ्या जगात जातो. शेवटच्या जगात आत्मा अमरत्व प्राप्त करतो आणि प्रकाशात रूपांतरित होतो.
5 / 9
मृत्यूनंतरचा पहिला मुक्काम हा अधोलोकी असतो. तिथे पुढील जगासाठी तयारी होईपर्यंत हा आत्मा तिथेच वास्तव्य करतो. हा वेळ आत्म्याच्या थकव्यावर आणि गरजेवर अवलंबून असतो.
6 / 9
तिसरे जग हे पृथ्वीसारखेच असल्याचे म्हटले आहे. यात समान विचारसरणीचे लोक एकत्र येतात आणि त्यांच्या आवडीचे जग निर्माण करतात. एखाद्याने आयुष्यात वाईट कृत्ये केली असतील तर त्याला येथे अंधारात आणि एकटे रहावे लागते. त्यांची स्वार्थी वृत्ती सुटेपर्यंत ते अंधारातच राहतात.
7 / 9
एडो नावाचे जग अगदी पृथ्वीसारखे दिसते पण येथील रंग आणि दृश्ये इतकी सुंदर आहेत की मानवी कल्पनाशक्तीही पराभूत होते. फ्रेडरिक यांनी या जगापर्यंत प्रवास केल्य़ाचे म्हटले आहे. आता या गोष्टी आपल्याला विचित्र वाटत असल्या तरी लोकमत या गोष्टींची पुष्टी करत नाही. भारतातही अनेकदा अशा प्रकारच्या लोकांकडून दावे केले जातात.
8 / 9
सहाव्या जगात पोहोचल्यानंतर, आत्मा शरीर सोडतो आणि पांढरा प्रकाश बनतो. फ्रेडरिकला याची माहिती तिथे आधीच पोहोचलेल्या आत्म्यांनी दिली होती.
9 / 9
आत्म्याचा हा प्रवास त्याच्या नैतिक आणि आध्यात्मिक विकासावर अवलंबून असतो. प्रत्येक आत्म्याला एकसारखाच प्रवास मिळेल असे नाही, असे कार्टर यांनी म्हटले आहे.
टॅग्स :spiritualअध्यात्मिक