साप्ताहिक राशीभविष्य: 'या' सहा राशींना अचानक धनलाभ होऊ शकतो, तर यांना नोकरीत चांगली संधी मिळेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 08:20 IST
1 / 15या सप्ताहाच्या शेवटी शुक्र मकर राशीतून कुंभ राशीत जाईल. अन्य कोणतेही ग्रहपालट नाहीत. ग्रहस्थिती अशी- हर्षल मेष राशीत, गुरु कुंभ राशीत, मंगळ कर्क राशीत, केतू कन्या राशीत, बुध वृश्चिक राशीत, सूर्य धनू राशीत आहेत. 2 / 15प्लूटो आणि शुक्र मकर राशीत आहेत. शनिवारी शुक्र कुंभ राशीत जाईल. तेथे त्याची युती शनीशी होईल. राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीतून होईल. गुरुवारी सफला एकादशी आहे. शनिवारी प्रदोष आहे. 3 / 15रविवार, दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी (दुपारी २:३२ पर्यंत) आहे. उत्तरा नक्षत्र अहोरात्र राहील. दुपारी १२:५६ पर्यंत सिंह तर त्यानंतर कन्या रास राहील. आज चांगला दिवस आहे. भानुसप्तमी व कालाष्टमी आहे. राहू काळ सायंकाळी ४:३० ते ६ या वेळेत राहील.4 / 15मेष - संमिश्र ग्रहमान : संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. काहींना कामानिमित्त प्रवास करावा लागेल. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्याच्या तक्रारी राहतील. नोकरीत तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. तुमच्या योग्यतेची दखल घेतली जाईल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. आपण त्यांना जास्त महत्त्व देऊ नका. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. परीक्षा देणार असाल तर महत्त्वाची माहिती कळेल. वाहने जपून चालवा. टीप : बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.5 / 15वृषभ- प्रेमात सफलता मिळेल : नोकरीतील कामाचा ताण कमी होईल. त्यामुळे तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. मुले तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. काही लोकांकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू प्राप्त होतील. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. तुमचे बाजारपेठेचे अंदाज बरोबर ठरतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. मुलांची प्रगती होईल. टीप : रविवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.6 / 15मिथुन - समाजसेवा घडेल : साधक बाधक परिस्थिती राहील. व्यवसायात तुमचे नाव होईल. तुमचा सल्ला लोकांना उपयुक्त ठरेल. मुले प्रगती करतील. एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. घरगुती स्वरूपाचे वाद विकोपाला जाणार नाहीत याची काळजी घ्या. स्वतःच्या व घरातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचून काढा. उत्तरार्धात महत्त्वाची कामे होतील. अचानक घरी पाहुणे येतील. टीप : रविवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.7 / 15कर्क- प्रवास घडून येतील : व्यवसायात सतत व्यस्त राहाल. काहींना कामानिमित्त प्रवास घडून येतील. सप्ताहाची सुरुवात संमिश्र घटनांनी होईल. आर्थिक लाभ होतील. मात्र हाती आलेला पैसा खर्च होईल. आर्थिक नियोजन नीट केले नाही तर हाती काही उरणार नाही. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. त्यामुळे मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. नोकरीत काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे. टीप : बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.8 / 15सिंह- उत्तरार्ध चांगला राहील : सप्ताहाच्या पूर्वाधर्धापेक्षा उत्तरार्ध तुम्हाला चांगला जाईल. पैसा मिळवण्यासाठी बरीच दगदग करावी लागेल. कागदोपत्री पूर्तता करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्या. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. व्यवसायात भरभराट होईल. मात्र गुंतवणूक करताना सावध राहा. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत काही बदल होऊ शकतात. घरी पाहुणे मंडळी येतील. जनसंपर्क चांगला राहील. मनावरील दडपण निघून जाईल. टीप : बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.9 / 15कन्या- प्रोत्साहन मिळेल : सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या समोर काही अडचणी असतील. मनात काही शंका असतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. उत्तरार्धात तुमची महत्त्वाची कामे होतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. पैशाची बचत करण्यावर भर दिला पाहिजे. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. भावंडांशी सख्य राहील. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. मात्र सतत व्यस्त राहाल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. टीप : बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.10 / 15तूळ- कामे मार्गी लागतील : सप्ताहाच्या प्रथम चरणात काही अडचणी असतील. मात्र थोडे संयमाने वागल्यास अडचणी दूर होण्यास वेळ लागणार नाही. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी वेळ द्या. चिकाटी सोडता कामा नये. बुधवारपासून परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. कामे मार्गी लागतील. प्रेमात गैरसमज होऊ शकतात. शुक्रवार, शनिवार धनस्थानातून होणाऱ्या बुध-चंद्र युतीची शुभ फळे मिळतील. आर्थिक बाजू बळकट होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. टीप : बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.11 / 15वृश्चिक - यश मिळेल : कार्यक्षेत्रातील कामाचा ताण कमी होईल. गैरसमजाचे वातावरण निवळेल. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र देवाण-घेवाण करताना खबरदारी घ्या. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. एखादी व्यक्त्ती तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल. शुक्रवार, शनिवार अधिक सकारात्मक परिणाम दिसून येतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. टीप : रविवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.12 / 15धनू- चांगल्या बातम्या कळतील सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. नोकरीत थोडे संशयाचे वातावरण राहील. व्यवहारात स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे. काहींना नवीन जबाबदारी मिळेल. घरात एखाद्या कारणावरून गैरसमज होऊ शकतात. अनपेक्षित पाहुणे येतील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. मित्र मैत्रिणींच्या भेटी होतील. त्यांच्याशी बोलून मन मोकळे होईल. आर्थिक बाजू बळकट होईल. टीप : रविवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.13 / 15मकर- अडलेली कामे आतील का सप्ताहाच्या उत्तरार्धात तुमची अडलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. कामाचा ताण कमी राहील. इतरांच्या भानगडीत पडू नका. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. 'करायला गेलो एक आणि झाले भलतेच' असा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. प्रेमात गैरसमज होऊ शकतात. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. टीप : बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.14 / 15कुंभ- संमिश्र ग्रहमान राहील : सुरुवातीला संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. काही फायदे काही तोटे होतील. अवास्तव अपेक्षा ठेवता कामा नये. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. बुधवारपासून परिस्थिती आटोक्यात येईल. तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. नशिबाचा कौल तुमच्या बाजूने राहील. काहींना पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरीत नवीन संधी मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. टीप : बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.15 / 15मीन- अचानक धनलाभ होईल : सप्ताहाची सुरुवात संथगतीने होईल. आरोग्याच्या किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी असतील. जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. शुक्रवार, शनिवार भाग्याची चांगली साथ लाभेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. त्यामुळे तुम्हाला हलके हलके वाटेल. टीप : सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस. -विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)