By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:00 IST
1 / 7घर असो नाहीतर आपले कार्यस्थळ, अर्थात नोकरी-व्यवसायाची जागा; तिथले वातावरण सकारात्मक नसेल तर प्रगती होणार नाही की लक्ष्मी कृपादेखील होणार नाही. आपल्या नकळत काही गोष्टींमुळे वास्तू दोष निर्माण होतात. ते दूर होऊन आपली सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी वास्तू शास्त्राने सांगितलेले बदल ताबडतोब करा, जेणेकरून नवीन वर्षात तुम्हाला तुमच्या कामाचा योग्य आणि वाढीव मोबदला मिळेल. 2 / 7नोकरी- व्यवसाय सुरू करण्यापेक्षा, ते टिकवून ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. परंतु कधीकधी असे घडते, की कठोर परिश्रम करूनही पुरेसा मोबदला मिळत नाही किंवा तोटा सहन करावा लागतो. वास्तुशास्त्रानुसार हे नकारात्मक ऊर्जेचे लक्षण असते. अशा स्थितीत काही विशेष उपाय केले असता नकारात्मक ऊर्जा दूर करणे सहज शक्य होते. चला तर ते उपाय जाणून घेऊया. 3 / 7व्यवसाय वाढवण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. कमळाच्या बियांची माळ जिला कमलगट्टा माळ म्हणतात, जिचा उपयोग जपासाठी देखील केला जातो. ही माळ लक्ष्मी मातेला प्रिय असल्याने लक्ष्मी उपासक या माळेचा वापर करतात. वास्तू शास्त्रानेदेखील त्याचा वापर सुचवला आहे. एका सुती लाल कापडात कमळगट्टा माळ ठेवा आणि ती माळ आपल्या तिजोरीत ठेवा, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि धनसंपत्तीचे मार्ग खुले होतात. 4 / 7शास्त्रानुसार सकाळी उठल्यावर मोबाईल दर्शन घेण्याऐवजी ज्या हातांनी भरपूर श्रम करायचे आहेत त्या तळ हाताचे दर्शन घ्यावे आणि जमिनीला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करावी. त्यावेळी हा श्लोक म्हणावा- कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती। कर मूले स्थितो ब्रह्मा प्रभाते कर दर्शनम्॥5 / 7प्राणी आणि विशेषतः माशांना खाऊ घालावे असे आपली संस्कृती सांगते. त्यालाच जोड वास्तू शास्त्राने दिली आहे. बुधवारी आणि शुक्रवारी माशांना पिठाच्या गोळ्या आणि पक्ष्यांना धान्य खाऊ घाला. असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळेल. याशिवाय व्यवसायातही वाढ होईल. या उपायामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. हा उपाय सलग २ महिने करावा. 6 / 7व्यवसायात यश मिळवण्यासाठी केशर मिश्रित गंधात कापसाचा बोळा भिजवावा. तो कापूस आपल्या कामाच्या ठिकाणी एखादी देवाची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास तिच्यासमोर ठेवा. केशर हे सुबत्तेचे लक्षण आहे. त्याचा वापर करून आपण आपल्या क्षेत्रात सुबत्ता अर्थात धन संपत्ती प्राप्त करू शकतो. यासाठी ते गंध रोज कपाळीदेखील लावा, जेणेकरून तुमचा लवकरच भाग्योदय होउ शकेल!7 / 7दिवा पाहुनी लक्ष्मी येते, हे आपण जाणतो. म्हणून संध्याकाळी चुकूनही केर काढू नका आणि व्यवसायाच्या प्रवेश द्वाराजवळ तसेच तुळशीजवळ दिवा लावा. त्यामुळे लक्ष्मी कृपा होईल आणि दिव्यासारखे तुमचेही आयुष्य यश, धन, संपत्ती आणि प्रगतीने उजळून निघेल.