शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vastu Tips: घरच्या मुख्य दरवाजाजवळ 'ही' तीन रोपे लावल्याने कुबेर देव होतात प्रसन्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 13:32 IST

1 / 5
असे म्हटले जाते की वास्तु नियमांचे पालन केल्याने माणसाच्या घरात व मनात नेहमी शांती राहते. तर दुसरीकडे वास्तुदोषांकडे दुर्लक्ष केल्यास व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. तूर्तास आपण लाभाबद्दल जाणून घेऊ.
2 / 5
वास्तुशास्त्रात अशी काही झाडे आणि रोपे सांगितली आहेत, ती घरात लावल्याने वास्तुदोष दूर होतात. तसेच व्यक्तीच्या घरात सुख-समृद्धी नांदते. अशी काही रोपे वास्तूमध्ये ठेवणे शुभ आणि पवित्र मानले गेले आहे. चला जाणून घेऊया मुख्य तीन रोपांबद्दल, जी लावली असता घरात लावल्याने देवी लक्ष्मी स्वतः वास करते. आणि कुबेर देवाच्या कृपेने त्या वास्तूमध्ये पैशाची कमतरता कधीच भासत नाही. पुढीलपैकी एक रोप घराच्या प्रवेश द्वाराजवळ लावा.
3 / 5
हिंदू धर्मात शमीच्या रोपाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. असे म्हणतात की शमीचे रोप भगवान शंकराला खूप प्रिय आहे. तसेच शनिवारी शमीच्या रोपाची पूजा केल्याने शनिदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो. घरामध्ये शमीचे रोप लावणे शुभ मानले जाते. घराच्या मुख्य दरवाजावर लावल्याने घरात सुख-समृद्धी नांदते असे म्हणतात. देवी लक्ष्मीची कृपा घरावर राहते. सकारात्मक ऊर्जा राहते आणि आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते. कुबेर देवाचीही कृपा राहते.
4 / 5
ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट लावल्यास शुभ फळ मिळते. घरामध्ये मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते. मनी प्लांटमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. हे रोप धन संपत्तीला आकर्षित करते. घराच्या मुख्य दरवाजावर लावल्याने संपत्तीचे खजिनदार कुबेर स्वामीदेखील आकर्षित होऊन वास्तूला आशीर्वाद देतात. फक्त त्या मनी प्लांटची वाढ छताच्या दिशेने होईल याची काळजी घ्या. घरामध्ये मनी प्लांट लावल्याने सुख-समृद्धी येते असे म्हणतात.
5 / 5
घरामध्ये केळीचे रोप लावणे शुभ मानले जाते. यामुळे वास्तूला भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद प्राप्त होतो. हे रोप घरामध्ये विशेषतः प्रवेशद्वाराजवळ लावल्याने संपत्ती वाढते. सुख-समृद्धी प्राप्त होते. जर तुम्ही गुरुवारी उपवास करत असाल तर या दिवशी केळीच्या रोपाची पूजा करावी. या रोपाची पूजा केल्याने भगवान श्री हरी आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. तसेच भगवान कुबेरांचे आशीर्वाद प्राप्त होतात.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र