घरातील भांडण तंटा कमी होण्यासाठी खात्रीशीर उपाय करून पहा; नक्की बदल जाणवेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 14:53 IST
1 / 5घर घेताना किंवा बांधताना प्रत्येक खोलीत पुरेसा सूर्यप्रकाश कसा येईल याकडे लक्ष द्या. तसेच राहत्या घरामध्ये अंधाराचे साम्राज्य फार काळ राहू देऊ नका. त्यामुळे नकारात्मकतेवर मात करता येईल व घरात प्रसन्न वातावरण राहील. अंधाऱ्या खोलीमुळे नैराश्य जाणवत राहते. म्हणून सूर्यप्रकाश अतिशय महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा. 2 / 5बेडरूममध्ये लाकडी पलंग असणे शुभ असते. नवरा बायकोने दोन वेगवेगळ्या जोडलेल्या पलंगावर झोपण्याऐवजी सलग एका पलंगावर झोपावे. तसेच गादीसुद्धा एक असावी. दोन जोडलेल्या गाद्यांवर झोपण्यामुळे किंवा विभागलेलया पलंगावर झोपल्यामुळे नवरा बायकोत कटुता येते. म्हणून एकसंध गादी असलेला बेड झोपण्यासाठी वापरावा. 3 / 5जेवायला बसताना पूर्व उत्तर दिशा निवडावी किंवा ते शक्य नसल्यास पूर्व दक्षिण दिशा निवडावी. शक्यतो सर्वांनी एकत्र जेवावे. आणि जेवताना कटू विषय टाळावे. मौन पाळणे उत्तम. परंतु एकत्र जेवल्याने स्नेह वृद्धिंन्गत होतो. 4 / 5घरातल्या एखाद्या भिंतीला तडा गेली असेल तर ती भेग वेळेत बुजवून टाकावी. कारण ती भेग दीर्घकाळ ठेवणे अशुभ मानले जाते. 5 / 5आपल्या दारात किंवा खिडकीत तुळशीचे रोप असतेच, परंतु ती दिशा पूर्व उत्तर असेल अशा बेताने तुळस ठेवावी. तुळस मुळात पवित्र असतेच, परंतु या दिशाबदलाचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला निश्चित दिसून येईल.