Travel: सोमवारच्या मुहूर्तावर भारत-चीन सीमेवरील टिम्मरसैणच्या बाबा बर्फानी यांची मिळाली पहिली झलक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 15:50 IST
1 / 6भारत-चीन सीमेवर असलेल्या निती खोऱ्याच्या टिम्मरसैण गुहेत बाबा बर्फानी दिसू लागले आहेत. आज सोमवारी अर्थात शंकराच्या आवडत्या वारी या वर्षातील बर्फ़ाच्या शिवलिंगाची पहिली झलक आज भाविकांच्या नजरेस पडली, हा शुभ योग आहे. ज्यामध्ये गुहेतील बर्फातून शिवलिंगाचा आकार तयार झाला आहे. 2 / 6टिम्मरसैण येथील बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक येत असतात. जोशीमठ-मलारी महामार्गावर टिम्मरसैण गुंफा असून येथे डिसेंबर ते मार्च या कालावधीत बाबा बर्फानी गुहेत दिसतात. येथे बाबा बर्फानी शिवलिंगाच्या आकारात प्रकट होतात.3 / 6हिवाळ्यात तिथे भरपूर बर्फवृष्टी होते. अनेक नद्यांचे बर्फात रूपांतर होते. टिम्मरसैण गुहेत बाबा बर्फ़ानी शिवलिंगाचा आकार घेऊन प्रगट होतात. ते पाहता भाविकांना ते प्रति अमरनाथ असल्याचा भास होतो. 4 / 6जोशीमठ-मलारी महामार्गाने वाहनाने जाता येते. येथून तीन किलोमीटर पायी प्रवास केल्यावर टिम्मरसैण गुहेत पोहोचता. तिथे गेल्यावर बाबा बर्फ़ानीचे विलोभनीय शिवपिंडीचे दर्शन घडते. 5 / 6तिथे जाण्याआधी भाविकांना मलारी येथील लष्करी चेकपोस्टवर नाव, पत्ता आणि ओळखीचा पुरावा सादर करावा लागतो. कारण ती भारत आणि चीन यांना जोडणारी सीमारेषा आहे. 6 / 6२०१९ मध्ये भाविकांना बाबा बर्फानीचे दर्शन देण्याची योजना सरकारने आखली होती, मात्र सततचे हवामान आणि रस्ता बंद असल्याने यात्रेत अडथळे येत होते. लॉकडाऊन काळात तिथे बरेच काम करण्यात आले. त्यामुळे यंदा बाबा बर्फ़ानी यांच्या दर्शनाचे द्वार पुनश्च खुले झाले आहे.