शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नाग हे कुलपुरुषाचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आज 'अशी' साजरी करा नागदिवाळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 13:18 IST

1 / 4
नागाचा संदर्भ आपल्या धर्मग्रंथात अनेक ठिकाणी आलेला आहे. श्रीविष्णू हे शेष नागाची शय्या करून त्यावर आसनस्थ झाले आहेत. देव दानवांनी केलेल्या समुद्र मठनात वासुकी नावाचा दोरासारखा उपयोग करण्यात आला होता.
2 / 4
नागलोक नावाची एक अद्भुत सृष्टी पाताळात आहे, असा धार्मिक कथांमधून उल्लेख आढळतो व त्या ठिकाणी नागदेवता राहतात असेही सांगितले जाते. माणसाच्या ठायी जी कुंडलिनी शक्ती आहे ती मणक्याच्या खाली सर्पकृती वेटोळे घालून बसलेली असते.
3 / 4
मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नागदिवाळी म्हणतात. नाग हे कुळाच्या मूळ पुरुषाचे प्रतील मानतात. या मूळ पुरुषाच्या कृपेने घरातील पुरुषांना कृपेने घरधन्याला आणि घरधनीला दिर्घआयुष्य लाभावे, असा हा कुलधर्म करण्यामागील हेतू असतो.
4 / 4
या दिवशी घरातील गृहलक्ष्मी नागाच्या प्रतिमेची पूजा करतात आणि घरात जेवढी मोठी माणसे असतात तेवढी पक्वान्ने करून ती नागोबाच्या प्रतिमेपुढे ठेवून त्यावर दिवे लावतात. दिवा हे दिर्घआयुष्याचे प्रतीक आहे. म्हणून नागाच्या प्रतिमेसमोर दिवा लावून त्याला नैवेद्य दाखवून महाप्रसादाचा लाभ सगळे घेतात.