शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मार्च महिन्यात चार राशींना होणार आर्थिक लाभ; जुळून येतोय चतुर्ग्रही योग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 12:32 IST

1 / 5
मार्च एंडिंग हा आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाचा महिना. जमा, बाकी, खर्च, देणं, घेणं असे सगळे व्यवहार तपासून आगामी वर्षाचे नवे हिशोब मांडले जातात. अशातच चतुर्ग्रही योगाचा सकारात्मक परिणाम होऊन या आर्थिक वर्षांची प्रभावी सुरुवात कोणत्या राशींच्या वाट्याला येते ते जाणून घेऊ!
2 / 5
या राशीच्या दहाव्या घरात चतुर्ग्रही योग तयार होत आहे. चतुर्ग्रही योगाच्या प्रभावाने व्यवसायात आर्थिक लाभ होईल. नवीन नोकरीची संधी किंवा बढतीची ऑफर येईल. याशिवाय आर्थिक बाजू मजबूत राहण्याची शक्यता आहे. कुंडलीचे दहावे घर करिअर आणि कर्माचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे सदर योग मेष राशीसाठी लाभदायक ठरू शकेल.
3 / 5
या राशीच्या भाग्य स्थानात चतुर्ग्रही योग तयार होत आहे. चतुर्ग्रही योगाच्या शुभ प्रभावामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच ज्या कामात हात घालालते पूर्ण होईल. करिअरमध्ये प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक प्रगतीसोबतच कामाचा विस्तार होईल.
4 / 5
चतुर्ग्रही योग तूळ राशीसाठी आनंददायी ठरणार आहे. चतुर्ग्रही योगाच्या प्रभावाने सुखाची साधने वाढतील. नोकरीत पगार वाढू शकतो. त्यामुळे बरेच दिवस रखडलेले काम पूर्ण होईल. व्यवसायात आर्थिक गुंतवणुक लाभदायक ठरू शकते. भविष्यात आर्थिक फायदा होऊ शकतो.
5 / 5
पराक्रमी घरात चतुर्ग्रही योग तयार होत आहे. या योगाच्या प्रभावाने पराक्रमात वाढ होईल. यासोबतच तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळेल. कुटुंबातील भाऊ-बहिणीकडून आर्थिक सहकार्य मिळेल. शत्रूंवर विजय मिळवता येईल. व्यवसायात लाभ होईल. याशिवाय अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष