शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shukra Sankraman 2022: शुक्र संक्रमणामुळे 'या' तीन राशींना नोकरी व्यवसायात होणार भरघोस लाभ; इन्क्रिमेंट नक्की!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 16:52 IST

1 / 4
ऑगस्टचा दुसरा आठवडा कर्क राशीत शुक्राच्या संक्रमणाने सुरू होत आहे. शुक्राचे संक्रमण कर्क राशीत सूर्य आणि शुक्राचा संयोग करेल. यश, प्रेम, पैसा, करिअर या सगळ्या बाबतीत आघाडीवर राहण्यास मदत करेल. पुढील तीन राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि रविचा संयोग खूप चांगला राहील. या लोकांना भरपूर पैसा मिळेल आणि नवीन नोकरी व्यवसायात भरघोस लाभ होईल!
2 / 4
मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शुक्राचा योग शुभ राहील. या लोकांना पैशाच्या बाबतीत मोठे यश मिळू शकते. अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. करिअरही एका उंचीवर जाईल. व्यावसायिकांसाठीही हा काळ चांगला राहील.
3 / 4
कर्क राशीत शुक्र आणि सूर्याचा संयोग कन्या राशीला खूप लाभ देईल. त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. नवीन नोकरी-प्रमोशन मिळू शकते. व्यापाऱ्यांना उद्योग विस्ताराच्या दृष्टीने मोठी संधी मिळू शकते! जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. एकंदरीत हा काळ पैसा आणि कामाच्या दृष्टीने खूप चांगला राहील. वैवाहिक आयुष्यही आनंदात जाईल.
4 / 4
तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. अशा स्थितीत शुक्र आणि सूर्याच्या संयोगामुळे तूळ राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. या लोकांना नोकरीच्या बाबतीत मोठा फायदा होऊ शकतो. नवीन नोकरी मिळेल. तुमच्या आवडीचे काम मिळाल्याचा तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. बढती-वाढ मिळण्याची शक्यता आहे. कामाचे कौतुक होईल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. कौटुंबिक नातेसंबंध सुदृढ होतील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष