Shravan Somwar Vrat 2022 : अवघ्या काही क्षणात घ्या ५२५ शिवलिंगाचे दर्शन आणि मिळवा १२ ज्योर्तिर्लिंग दर्शनाचे पुण्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 15:31 IST
1 / 5कोटा येथील शिव धाम अतिशय प्रचलित आहे. तिथे जाणारी व्यक्ती या शिवालयाचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही.2 / 5या शहरात आणखीही अनेक शिव मंदिरं आहेत परंतु या शिवधामात गेल्यावर वेगळीच प्रसन्नता जाणवत असल्याची भक्तांना प्रचिती येते.3 / 5५२५ शिवलिंग एका जागी असणारे हे भारतातील एकमेव मंदिर आहे. या व्यतिरिक्त नेपाळ येथील पशुपतीनाथ येथे ५२५ शिवलिंगाचे दर्शन होते.4 / 5येथील शिवलिंगाला अभिषेक केल्याने ५२५ शिवलिंगांच्या अभिषेकाचे पुण्य मिळते.5 / 5काही भक्तांना येथे शिवलिंगाची मोजणी केल्यावर ती केवळ ५२५ नसून एक हजार शिवलिंग असल्याची अनुभूती आली आहे. हा श्रद्धेचा आणि देवत्त्वाच्या प्रचितीचा भाग म्हटला पाहिजे.