शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Lord Shiva in Dreaming: तुम्हांला स्वप्नात महादेव शिवशंकरांचे दर्शन झाले? पाहा, यामागील नेमका अर्थ व मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 08:47 IST

1 / 10
माणूस हा आशावादी असतो. जीवनात पुढे जाण्यासाठी स्वप्न पाहण्याचा सल्लाही दिला जातो. आपल्या मनातील सुप्त इच्छा आपण स्वप्नाच्या माध्यमातून पाहात असतो. स्वप्न ही माणसाला आशावादी बनवत असतात.
2 / 10
आपण झोपल्यानंतर आपल्याला नेमके काय स्वप्नात दिसेल, हे आपल्या हातात नसते. कोणत्याही प्रकारची स्वप्न माणसाला पडतात. काही स्वप्न एकदम सुखावणारी असतात. मानसिक आनंद देणारी स्वप्न कधी संपूच नये, असे वाटत राहते. एखादे स्वप्न ऐन रंगात आले असताना अचानक जाग येते आणि मग जागेपणी आपला हिरमोड होतो.
3 / 10
काही स्वप्न इतकी भयावह असतात की, खाडकन जाग येते. घाम फुटतो. अशी स्वप्न पुन्हा नको, असे कायम वाटत राहते. काही जणांना स्वप्नात देवदर्शन होते. कुलदेवता, इष्टदेवता स्वप्नात दिसतात. स्वप्नात देवदर्शन होणे शुभ मानले जाते.
4 / 10
श्रावण महिन्यात केलेल्या शिवपूजनाला विशेष महत्त्व असते, अशी मान्यता आहे. शिवमहिमा अगाध आहे, असे मानले जाते. त्रिमुर्तींमध्ये तसेच पंचदेवतांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान शिवाला आहे. शिवाशिवाय पृथ्वीवरील कोणतीही गोष्ट अपूर्ण आहे. कारण महादेव शिवशंकर लयतत्त्वाचे स्वामी आहेत, असे मानले जाते. महादेवाचे विविध स्वरुपात पूजन केले जाते. तसेच शिवाची निगडीत असलेल्या अनेक गोष्टींचे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे.
5 / 10
ज्योतिषशास्त्रातील स्वप्नशास्त्र या शाखेत माणसाला पडणाऱ्या स्वप्नांचा अभ्यास केला जातो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनही माणसाला पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्हाला माहिती आहे का, जर महादेव किंवा महादेवांशी निगडीत एखादी गोष्ट स्वप्नात दिसली, तर त्याचा अर्थ काय होतो? चला जाणून घेऊया...
6 / 10
जर आपल्याला स्वप्नात शिव मंदिर दिसले किंवा तुम्ही एखाद्या शिव मंदिरात जात आहात असे दिसले तर हे फार शुभ असल्याचे म्हटले जाते. असे म्हणतात की, हे स्वप्न तुमच्या गंभीर अडचणी किंवा आजारातून मुक्तता होईल याची ग्वाही देते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
7 / 10
स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला महादेव तांडव करताना दिसले तर असे मुळीच समजू नका महादेव तुमच्यावर क्रोधीत झाले आहे किंवा हे अशुभ आहे. याउलट या स्वप्नाचा अर्थ होतो की, तुम्हाला शत्रूंपासून होणाऱ्या जाचातून मुक्तता मिळेल. लवकरच महादेव स्वत: तुम्हाला त्रास होणाऱ्या शत्रूंचा विनाश करतील, असा या स्वप्नाचा अर्थ होतो असे म्हटले जाते.
8 / 10
जर तुम्हाला महादेव आणि माता पार्वती सोबत स्वप्नात दिसले तर समजा की, तुमच्यावर त्यांची विशेष कृपा आहे. असे म्हणतात की, वैवाहीक जिवनात होणारे मतभेद किंवा येणाऱ्या अडचणी लवकरच संपतील. परंतु लक्षात ठेवा की असे स्वप्न पडल्यास महादेव आणि माता पार्वतींचा जलाभिषेक करावा. यानंतर त्यांना मध अर्पण करून सुखी वैवाहिक जिवनाची मागणी करावी, असे सांगितले जाते.
9 / 10
कधी स्वप्नात तुम्हाला साप किंवा त्रिशुळ दिसले तर समजा की, तुम्हाला आता लाभच लाभ होणार आहे. जर स्वप्नात साप दिसला तर तुम्हाला आर्थिक लाभ होणार असल्याचे संकेत असल्याचे मानले जाते.
10 / 10
तसेच जर स्वप्नात त्रिशुळ दिसले तर सर्व संकटांचा विनाश होणार असल्याचे सांगितले जाते. असे म्हणतात की, त्रिशुळ जीवनातील सर्व संकटांचा नाश करतो आणि कठीनाहूनही कठीण परिस्थितीतून मुक्तता होण्यासाठी आत्मबळ देतो, असे सांगितले जाते.
टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल