शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शनिवारी अनंत चतुर्दशी २०२५: साडेसाती, शनि महादशा सुरू आहे? ‘हे’ उपाय तारतील अन् भरभराट होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:50 IST

1 / 12
Anant Chaturdashi 2025: ०६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी आहे. सार्वजनिक आणि हजारो घरगुती गणपती बाप्पांना या दिवशी निरोप दिला जातो. गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या गणपती बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला जातो. लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना खूप वाईट वाटते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशी आर्त विनवणी केली जाते.
2 / 12
अनंत चतुर्दशी हा दिवस प्रामुख्याने गणेशोत्सवाची सांगता म्हणून प्रचलित आहे. परंतु, अनंत चतुर्दशीला अनंताचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे.या दिवशी श्रीविष्णूंचे विशेष व्रत केले जाते. इतर व्रतांप्रमाणे हे व्रत सर्व मंडळी करत नाहीत. कारण हा एक वसा अहे. तो आचरणात आणणे काहीसे कठीण आहे. हे व्रत सलग १४ वर्षे करावे लागते.
3 / 12
शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.२२ वाजेपासून पंचक सुरू होत आहे. गणपती विसर्जन, अनंत चतुर्दशी व्रत, मृत्यू पंचक सुरुवात या सर्व गोष्टी शनिवारी होत आहे. शनिवार या दिवसावर नवग्रहांचे न्यायाधीश मानल्या गेलेल्या शनि ग्रहाचा अंमल असतो. या दिवशी शनि संबंधित उपाय, उपासना, पूजन, नामस्मरण, आराधना करणे शुभ पुण्य फलदायी मानले जाते.
4 / 12
विद्यमान स्थितीत नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि ग्रह देव मीन राशीत विराजमान आहे. मीन राशी स्वामी गुरू आहे. आताच्या घडीला शनि मीन राशीत वक्री असून, नोव्हेंबर महिन्यात मार्गी होणार आहे.
5 / 12
शनि मीन राशीत जून २०२७ पर्यंत असणार आहे. शनि मीन राशीत विराजमान असल्यामुळे कुंभ, मीन आणि मेष राशीची साडेसाती सुरू आहे. कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. मीन राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. तर मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे.
6 / 12
तसेच सिंह आणि धनु या राशींवर शनि ढिय्या प्रभाव सुरू आहे. शनिवार या दिवसावर शनिचा अंमल असतो, असे म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी शनि उपासना, नामस्मरण करणे उत्तम मानले जाते. शनि महादशा साडेसाती आणि ढिय्या प्रभाव सुरू असणाऱ्यांनी नेमके काय करावे?
7 / 12
शनिवारी सकाळी तसेच प्रदोष काळी, तिन्ही सांजेला दिवे लागणीला शनी देवाचे स्मरण, पूजन करावे. शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते.
8 / 12
साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते. शनिवारी शनीदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे. तेलाचा दिवा लावावा. स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. शनिवारी काहीतरी दान करावे.
9 / 12
शनी बीज मंत्राचा जप दररोज करावा. विशेषत: शनिवारी अवश्य करावा. हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत.
10 / 12
शनीची उपासना, शनी स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनी चालीसा पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात. ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनीधामाची यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे.
11 / 12
पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे. शनिची महादशा सुरू आहे का, हे समजण्यासाठी जन्मकुंडली पाहणे महत्त्वाचे ठरते.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :chaturmasचातुर्मासPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकGanesh Mahotsavगणेशोत्सव 2025ganpatiगणपती 2025Ganpati Festivalगणपती उत्सव २०२५Ganesh Visarjanगणेश विसर्जन