शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शनिवारी लेकीला सासरी पाठवू नये म्हणतात, काय असेल बरं त्यामागील तर्क? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 12:14 PM

1 / 8
पूर्वी दूरच्या प्रवासाला मुहूर्त बघून निघत असत. मुहूर्त म्हणजे काय तर, ग्रहस्थिती आणि भौगोलिक स्थिती. आता आपण गुगल मॅप किंवा हवामानाचा अंदाज घेऊन प्रवासाला निघतो, हाच तो फरक. त्याच अनुषंगाने हा नियम दिला आहे. वातावरण, परिस्थिती यांची अनुकूलता पाहून मगच प्रवास करावा. मग प्रवासाची दिशा कोणतीही का असेना!
2 / 8
काही गोष्टी शास्त्र म्हणून वापरल्या जातात की सोय म्हणून हे ताडून पहायला हवे. अन्यथा रविवारची सुटी जोडून आल्यामुळे शनिवारी पाठवू नये हा तर्क आपल्याला जोडता येईल. कारण माहेरी आलेल्या मुलीचा सासरी जाताना पाय जड होतोच, अशात एखाद सुटीची भर पडली तर आनंदी आनंदच!
3 / 8
शनी महात्म्य पाहिले असता, या गोष्टी शनी देवाला प्रिय असल्याने त्यांची विक्री शनिवारी करू नये असे म्हटले जाते. उलट या गोष्टी शनिवारी दान केल्यास शनी महाराजांची कृपा लाभते असेही म्हटले आहे.
4 / 8
या गोष्टी शरीर धर्माशी निगडित आहेत. त्या घाईघाईने उरकल्या तर स्वच्छता नीट होणार नाही. या कामांसाठी रविवार राखीव असल्याने त्या दिवशी निवांत पणे ही कामं करावीत, असा साधा तर्क आपल्याला जोडता येईल.
5 / 8
वर म्हटल्याप्रमाणे या गोष्टींचादेखील शनी देवांच्या आवडीच्या यादीमध्ये समावेश होतो. आपण आपल्यासाठी गरजेच्या, चैनीच्या गोष्टी नेहमीच विकत घेतो, या गोष्टी शनिवारचे निमित्त साधून गरजू व्यक्तीला दान करून पाहा. तुम्हाला अधिक आनंद मिळेल आणि शनिकृपा होईल.
6 / 8
हे कारण आरोग्याशी आणि ऋतुमानाशी जोडले आहे. दूध सगळ्यांना पचते असे नाही, म्हणून त्यात हळद घालून प्यावे आणि रात्रीचे दही, ताक यांसारखे आंबट पदार्थ खाऊ नये, त्याचा प्रकृतीला अपाय होतो.
7 / 8
हा सुविचार आपण बालपणापासून शिकत आलो आहोत. केवळ शनिवारीच नाही, तर आजन्म खोटे बोलूच नये असा आपला संस्कार आहे. त्यात शनिवारचा धाक एवढ्यासाठी असेल, कारण शनी महाराज हे कडक शिक्षकासारखे कठोर शिक्षा करणारे आहेत. त्यांच्या नजरेतून चुका सुटत नाहीत. शिक्षा टाळायची असेल तर खोटे बोलणे टाळलेले बरे!
8 / 8
हा संस्कार देखील शनिवारपुरता नाही तर आयुष्यभराचा आहे. जन्म दात्यांचा सांभाळ करणं ही आपली जबाबदारी नाही तर कर्तव्य आहे. जे लोक कर्तव्याला जागतात ते शनी कृपेस पात्र ठरतात.