शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Samudra Shastra: 'या' पाच जन्मखुणा मानल्या जातात भाग्याचे लक्षण; तुमच्याही आहेत का? बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:26 IST

1 / 6
तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिले असेल की काही लोकांच्या शरीरावर काही ना काही खुणा नक्कीच असतात. या खुणा सामान्य दिसतात पण समुद्र शास्त्रानुसार या जन्मखुणांचा नक्कीच काही ना काही अर्थ असतो. या खुणा तुम्हाला भाग्योदयास कारणीभूत ठरतात.चला तर जाणून घेऊया शरीराच्या कोणत्या भागावर जन्मखूण असणे शुभ ठरते?
2 / 6
ज्या लोकांच्या पायावर जन्मखूण असते ते खूप समृद्ध असतात. त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की ज्या लोकांच्या पायावर जन्मखूण असते ते इतरांसाठीही खूप भाग्यवान ठरतात. ज्यांच्या पायावर जन्मखूण असते ते फार कमी कष्ट करूनही खूप प्रगती करतात.
3 / 6
जर एखाद्याच्या चेहऱ्यावर जन्मखूण असेल तर लोकांना ती सौंदर्याला बाधा वाटते, परंतु समुद्र शास्त्रानुसार चेहऱ्यावर जन्मखूण असणे हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते. आहे. चेहऱ्यावर जन्मत:च खूण असल्यामुळे माणसाला पैशाची कमतरता नसते. तसेच, अशा लोकांना संवेदनशील मानले जाते.
4 / 6
ज्या लोकांच्या पोटावर जन्मखूण असते. असे लोक कधीही उपाशी राहत नाहीत. कष्ट करो वा ना करो त्यांना दोन वेळच्या जेवणाची ददात नसते. जणू काही अन्नपूर्णा यांच्यावर प्रसन्न असते. त्यांना सहसा पोटाचे विकार होत नाहीत.
5 / 6
ज्या लोकांच्या छातीवर जन्मखूण असते ते खूप आनंदी स्वभावाचे मानले जातात. सामुद्रिक शास्त्रानुसार असे लोक कोणाचेही मन सहज जिंकू शकतात. तसेच असे लोक हे खूप रोमँटिक देखील मानले जाते. प्रेमाच्या बाबतीत खूप यशस्वी मानले जातात. त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते.
6 / 6
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या पाठीवर जन्मचिन्ह असते ते देखील खूप भाग्यवान मानले जातात. असे लोक मोकळ्या मनाचे असतात आणि आपले मत उघडपणे मांडतात. त्यांना संकुचित विचारसरणीची माणसे अजिबात आवडत नाहीत.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष