शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

४ वेळा गजकेसरी त्रिकोण राजयोग! ४ राशींना अपार यश, भाग्योदय काळ; मालामाल होण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 2:25 PM

1 / 9
ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. ऑगस्ट अनेकार्थाने उत्तम योगांचा महिना मानला जात आहे. सांस्कृतिक, धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अनेक शुभ योग जुळून येत आहेत. ४ महत्त्वाच्या ग्रहांचे या महिन्यात परिवर्तन होणार आहे.
2 / 9
ऑगस्ट महिन्यात दोन अतिशय शुभ योग तयार होणार आहेत. या महिन्यात चार वेळा गजकेसरी राजयोग तयार होणार असून यासोबतच त्रिकोण राजयोग जुळून येणार आहे. या २ राजयोगांमुळे चार राशींना खूप फायदा होणार आहे.
3 / 9
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गजकेसरी आणि त्रिकोण राज योग तयार होतो तेव्हा त्या व्यक्तीला खूप यश आणि प्रसिद्धी मिळते. त्रिकोण राजयोग हा असा शक्तिशाली राजयोग आहे जो कोणत्याही व्यक्तीची विषम वेळ बदलून त्याची जीवनशैली परिपूर्ण बनवतो, अशी मान्यता आहे.
4 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र आणि गुरू यांच्या योगाने गजकेसरी नामक शुभ राजयोग जुळून येतो. ऑगस्ट महिन्यात जुळून असलेल्या गजकेसरी आणि त्रिकोण राजयोगाचा नेमक्या कोणत्या ४ राशीच्या व्यक्तींना उत्तम धनलाभ, यश-प्रगतीची संधी मिळू शकेल, ते जाणून घेऊया...
5 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना गजकेसरी त्रिकोण राजयोगाचा शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतो. अमाप संपत्ती मिळू शकेल. जीवनात यश मिळण्याची शक्यता वाढेल. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी वेळ योग्य आहे. अपेक्षित निकाल मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही योग वरदानाचे काम करतील. भाग्याची भक्कम साथ लाभेल. व्यवसायात विशिष्ट गुंतवणूक आणि विशिष्ट आर्थिक नफा मिळविण्यासाठी अनुकूल वेळ असेल.
6 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना गजकेसरी त्रिकोण राजयोगाचा काळ इच्छापूर्तीचा ठरू शकेल. नशिबाच्या साथीने योग्य फळ मिळेल. गजकेसरी आणि त्रिकोण राजयोग करिअर वाढवतील. आव्हानांचा खंबीरपणे सामना करण्यासाठी आणि जीवनात चांगले परिणाम मिळविण्यासाठी ही एक शुभ स्थिती आहे. यशस्वी होण्यासाठी, योग्य ध्येय निश्चित करा आणि योग्य मालमत्ता मिळवू शकाल. यासोबतच तुम्हाला तुमची संपत्ती वाढवण्याच्या योग्य संधीही मिळतील. कठोर परिश्रम तुम्हाला सर्वोत्तम परिणाम देईल. या दरम्यान तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध खूप चांगले राहतील. मूळ रहिवाशांचे आरोग्यही अबाधित राहील आणि अचूक परिणामांसाठी प्रसंगाचे योग्य नियोजन करा.
7 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना गजकेसरी त्रिकोण राजयोगाचा काळ आर्थिक लाभाचा ठरू शकतो. कौटुंबिक जीवन चांगले असू शकेल. व्यवसायात लाभ होईल. व्यवसायाच्या विस्तारासाठी चांगला काळ. कला संगीताशी संबंधित लोकांना प्रसिद्धी आणि कलेतून लाभ मिळेल. वैवाहिक जीवन खूप चांगले जाणार आहे. कौटुंबिक तणाव कमी होईल. गुंतवणुकीसाठीही हा काळ चांगला आहे. या कालावधीत केलेली गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकेल.
8 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना गजकेसरी त्रिकोण राजयोगाचा काळ शुभ फल देईल. वाहन खरेदी करू शकता. मालमत्ता गुंतवणुकीसाठी चांगला काळ. प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढेल. सासरच्या मंडळींशी चांगले संबंध निर्माण होतील. सासरच्या लोकांकडून कोणत्याही स्वरूपात लाभ मिळतील. मात्र, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
9 / 9
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यAdhik Maasअधिक महिना