शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 10:22 IST

1 / 15
Panchak Kaal October 2025: सन २०२५ च्या ऑक्टोबर महिन्याची सांगता होऊन आता नोव्हेंबर महिना सुरू होत आहे. नोव्हेंबर महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात मीन राशीत वक्री असलेला शनि मार्गी होणार आहे. तसेच तूळ राशीत त्रिग्रही, चतुर्ग्रही योग जुळून येणार आहेत.
2 / 15
Panchak Kaal November 2025: नोव्हेंबर महिन्यात कार्तिकी एकादशी आहे. याच दिवशी चातुर्मास समाप्ती होत आहे. मराठी वर्षात चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. तुलसीविवाह, देव दिवाळी असे अनेक सण-उत्सव नोव्हेंबर महिन्यात आहेत. यातच ऑक्टोबर महिन्याच्या सांगतेला आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला अशुभाची सावली असलेला पंचक काळ लागत आहे.
3 / 15
ज्योतिषशास्त्रानसार, पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. चंद्राचे धनिष्ठा नक्षत्राचे तृतीय चरण आणि शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती या नक्षत्रांमधील भ्रमण कालावधीला पंचक मानले जाते. काही मान्यतांनुसार, या काळात केलेल्या अशुभ कार्यांचा पाचपट प्रभाव पडत असतो.
4 / 15
खगोल विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ३६० अंशाच्या भचक्रात पृथ्वीच्या ३०० डिग्री ते ३६० डिग्री मध्य भ्रमणाच्या कालावधीला पंचक मानले जाते. पंचक कालावधीत चंद्राचा पृथ्वीवर सर्वाधिक प्रभाव असल्याचे मानले जाते. शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०६ वाजून ४८ मिनिटांनी पंचक लागणार आहे. तर, मंगळवार, ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी पंचक समाप्त होत आहे.
5 / 15
पंचक लागण्याची वेळ, मुहूर्त शास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. पंचक कालावधीत शक्यतो शुभ कार्य केले जात नाही. पंचक कालावधी हा अमंगलाचे सूचक मानला गेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ते अशुभ मानले जाते.
6 / 15
पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्यासह लगतच्या कालावधीत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते, असा दावा शास्त्रात केल्याचे पाहायला मिळते.
7 / 15
पंचकाचे नाव वारानुसार असते. प्रत्येक पंचकाचे स्वतःचे महत्त्व असते. कोणत्या दिवशी पंचक लागणार, त्यानुसार पंचक नाव असते. म्हणजेच रविवारपासून सुरू होणारे पंचक रोग पंचक, सोमवारपासून सुरू होणाऱ्या पंचक राज पंचक, मंगळवारी अग्नि पंचक, शनिवारी मृत्यु पंचक आणि शुक्रवारी चोर पंचक लागते.
8 / 15
३१ ऑक्टोबर २०२५ रोजी शुक्रवारी पंचक सुरू होत असल्याने ते चोर पंचक म्हणून ओळखले जाणार आहे. ज्योतिषानुसार, सप्ताहातील प्रत्येक दिवशी लागणाऱ्या पंचकाचा प्रभाव हा भिन्न असतो. पंचक कोणत्या दिवशी लागते, यावर त्याचा प्रभाव कसा आणि किती असेल हे अवलंबून असल्याचे सांगितले जाते.
9 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार, पंचक कालावधीत काही कार्ये करणे निषिद्ध मानले गेले आहे. पंचक कालावधीत लाकडाची खरेदी करू नये. घराच्या छताच्या दुरुस्तीचे किंवा नवीन बांधकाम करू नये. पंचक काळात दक्षिण दिशेकडे प्रवास करणे वर्जित मानले गेले आहे. कोणात्याही प्रकारच्या इंधनाचे भंडारण करू नये, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
10 / 15
चोर पंचक काळात शक्यतो खूप मोठे व्यवहार टाळावेत, असा सल्ला दिला जातो. अन्यथा धनहानी, नुकसान होऊ शकते, असे सांगितले जाते. चोर पंचक काळात नवीन व्यवसाय, व्यापार किंवा व्यवहारांशी संबंधित कामांचा शुभारंभ करू नये, असे सांगितले जाते.
11 / 15
चोर पंचक काळात महत्त्वाच्या गोष्टी, वस्तू, पैसे चोरीला जाण्याची शक्यता बळावते, असे दावा केला जातो. त्यामुळे या काळात प्रवासात, व्यवहारात सतर्क राहावे. अखंड सावध राहावे, असे म्हटले जाते.
12 / 15
पंचक सर्व कार्यांसाठी अशुभ नसते, तर काही कार्यांसाठी पंचक अत्यंत शुभ मानले जाते. या कालावधीत यात्रा करणे, मुंडन कार्य, व्यापार आदी कार्यांसाठी पंचक शुभ मानले गेले आहे. पंचक कालावधीत जुळून येणाऱ्या शुभ योगांवर केलेल्या काही कार्यांचा सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतो.
13 / 15
तसेच साखरपुडा समारोह, विवाह आदी शुभ कार्ये पंचक कालावधीत केली जाऊ शकतात. काहीवेळा धनलाभाचे योगही प्रबळ होऊ शकतात.
14 / 15
याशिवाय वाहन खरेदी, गृह प्रवेश, शांती पूजन, मालमत्तेशी संबंधित स्थिर कार्ये करणे पंच कालावधीत शुभ मानली गेली आहेत.
15 / 15
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषspiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मासAdhyatmikआध्यात्मिक