शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Numerology: ‘या’ ४ मूलांकाच्या व्यक्तींना आगामी काळ अत्यंत शुभ; धनलाभाचे योग, उत्तम संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 12:26 IST

1 / 9
ज्योतिषशास्त्राला आपल्याकडे मोठे महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखांपैकी एक महत्त्वाची शाखा म्हणजे अंकशास्त्र. अंकांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयीचे अंदाज आणि भविष्य कथन केले जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. (Numerology)
2 / 9
अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे.
3 / 9
अंकशास्त्रानुसार, तुमचा मुलांक काढण्यासाठी तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष जोडता आणि त्यानंतर जो क्रमांक येईल तो तुमचा भाग्यांक असेल. उदाहरणार्थ, ३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ३ असतो.
4 / 9
मे महिन्यातील ग्रहस्थितीचा प्रभाव राशींसह मूलांकांवरही पडू शकते, असे सांगितले जाते. या महिन्यातील उत्तम ग्रहस्थितीचा कोणत्या मूलांकांच्या व्यक्तींना नेमका काय लाभ होऊ शकेल, ते जाणून घेऊया...
5 / 9
मे महिन्यातील आगामी कालावधी मूलांक १ असलेल्या व्यक्तींना उत्तम ठरू शकेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण नुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांकडून कौतुक होऊ शकेल. महिन्याच्या सुरुवातीला प्रगतीच्या संधी मिळतील. व्यवसायात लाभाच्या संधीही मिळतील. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना अनुकूल राहील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत सकारात्मक वेळ जाऊ शकेल.
6 / 9
मे महिन्यातील आगामी कालावधी मूलांक २ असलेल्या व्यक्तींना चांगला जाऊ शकेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. सहकाऱ्यांच्या मदतीने अवघड कामेही करता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळू शकतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. योजना वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल, कुटुंबाचे सहकार्य लाभू शकेल.
7 / 9
मे महिन्यातील आगामी कालावधी मूलांक ६ असलेल्या व्यक्तींना सकारात्मक जाऊ शकेल. काम आणि व्यवसायात बदलाच्या संधी उपलब्ध होतील. कार्यक्षेत्रातील वातावरण अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे शाबासकी मिळू शकेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळू शकतील. जीवनशैलीत काहीसा बदल होऊ शकेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.
8 / 9
मे महिन्यातील आगामी कालावधी मूलांक ७ असलेल्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकेल. नोकरी आणि व्यवसायातील चांगले राहील. सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकाल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. आर्थिक बाबतीत यश मिळू शकेल. महत्त्वाच्या लोकांशी तुमची भेट होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात नातेसंबंधांचा लाभ मिळेल. कुटुंबात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
9 / 9
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. तुमचा मूलांक आणि त्यासंदर्भातील योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष