Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 17:02 IST
1 / 9२०२६ हे वर्ष तुमच्यासाठी दुप्पट ऊर्जेचे असेल, कारण वर्षाचा अंकही १ आहे. हे वर्ष तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती घेऊन येईल. जर तुम्ही राजकारण, व्यवस्थापन किंवा स्वतःच्या व्यवसायात असाल, तर तुम्हाला मोठे यश मिळेल. नवीन प्रकल्पांची सुरुवात करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. मात्र, अतिआत्मविश्वास आणि अहंकारामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो, त्यामुळे नम्र राहणे गरजेचे आहे. आर्थिकदृष्ट्या हे वर्ष लाभाचे ठरेल, पण आरोग्याकडे, विशेषतः डोळ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.2 / 9तुमच्यासाठी २०२६ हे वर्ष संमिश्र फळ देणारे असेल. सूर्याची प्रखर ऊर्जा आणि तुमचा स्वभाव यामध्ये ताळमेळ बसवणे थोडे कठीण जाईल. भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, पण घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. नवीन भागीदारी करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या. मानसिक शांततेसाठी योगासने आणि मेडीटेशनचा तुम्हाला खूप फायदा होईल.3 / 9गुरुच्या प्रभावाखाली असलेल्या मुलांक ३ च्या व्यक्तींसाठी २०२६ हे वर्ष भाग्योदयाचे असेल. तुमचे ज्ञान आणि अनुभवाचा तुम्हाला फायदा होईल. शिक्षण क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी हे वर्ष अतिशय उत्तम आहे. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हे वर्ष फायदेशीर ठरेल. धार्मिक कार्यांत तुमचा सहभाग वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि नवीन पाहुण्याचे आगमन होण्याचे योग आहेत. केवळ आळस झटकून कामाला लागणे गरजेचे आहे.4 / 9राहूचा प्रभाव असलेल्या मुलांक ४ च्या व्यक्तींना २०२६ मध्ये शिस्त आणि नियोजनावर भर द्यावा लागेल. हे वर्ष तुमच्याकडून खूप कष्ट करून घेईल, पण त्याचे फळही शाश्वत असेल. अचानक धनलाभाचे योग आहेत, पण सट्टा किंवा जुगारापासून दूर राहा. परदेश प्रवासाचे स्वप्न यावर्षी पूर्ण होऊ शकते. आरोग्याबाबत विशेष काळजी घ्या, विशेषतः पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणापासून दूर राहणे हिताचे ठरेल.5 / 9बुध ग्रहाचा मुलांक ५ आणि वर्षाचा अंक १ यामुळे २०२६ मध्ये तुम्हाला अनेक नवनवीन संधी मिळतील. तुमच्या संवादाच्या जोरावर तुम्ही कठीण कामे सहज पूर्ण कराल. व्यवसायात मोठे बदल किंवा विस्तार करण्यासाठी हे वर्ष अनुकूल आहे. मित्र-मैत्रिणींकडून मदत मिळेल. नवीन गॅजेट्स किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. घाईघाईत घेतलेले निर्णय टाळा. प्रवासातून तुम्हाला आनंद आणि लाभ दोन्ही मिळेल. कौटुंबिक जीवनात संतुलन राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.6 / 9शुक्राच्या प्रभावामुळे २०२६ हे वर्ष तुमच्यासाठी चैनीचे आणि सुख-सोयींचे असेल. घराचे नूतनीकरण किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी हे वर्ष चांगले आहे. कला, चित्रपट आणि फॅशन क्षेत्रातील लोकांसाठी हे वर्ष सुवर्णकाळ ठरेल. वैवाहिक जीवनात माधुर्य राहील. मात्र, खर्चावर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक ओढाताण होऊ शकते. सामाजिक कार्यात तुमची ओढ वाढेल आणि नवीन ओळखी तुम्हाला करिअरमध्ये मदत करतील.7 / 9केतूचा प्रभाव असलेल्या मुलांक ७ साठी २०२६ हे वर्ष अध्यात्मिक प्रगतीचे आहे. तुम्ही स्वतःच्या अंतरंगाचा शोध घ्याल. जुन्या समस्यांपासून सुटका मिळेल. संशोधक आणि लेखकांसाठी हे वर्ष अतिशय फलदायी ठरेल. नवीन माहिती किंवा ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही प्रवास कराल. कौटुंबिक वादांपासून दूर राहणे तुमच्यासाठी चांगले आहे. विनाकारण चिंता करणे सोडा आणि ध्यानधारणेवर लक्ष केंद्रित करा. यावर्षी तुमची अंतर्ज्ञानाची शक्ती (Intuition) वाढेल.8 / 9शनीचा प्रभाव असलेल्या मुलांक ८ च्या व्यक्तींसाठी २०२६ हे वर्ष न्याय आणि कर्माचे असेल. गेल्या काही वर्षांतील कष्टांचे फळ यावर्षी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. लोहा, कोळसा किंवा रिअल इस्टेटमध्ये असलेल्या लोकांसाठी मोठे यश मिळेल. मात्र, शनी आणि सूर्याच्या विरुद्ध स्वभावामुळे वडिलांशी किंवा वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम ठेवा. आरोग्याबाबत हाडे किंवा सांधेदुखीचे त्रास जाणवू शकतात.9 / 9मंगळ ग्रहाचा मुलांक ९ आणि वर्षाचा अंक १ यांचा ताळमेळ तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास देईल. तुम्ही जुन्या गोष्टी संपवून नव्या उत्साहाने कामाला लागाल. जमिनीचे व्यवहार लाभदायक ठरतील. तुमच्या रागावर ताबा ठेवणे हे यावर्षीचे तुमचे सर्वात मोठे आव्हान असेल. साहसी क्रीडा किंवा संरक्षण क्षेत्रात असलेल्यांसाठी हे वर्ष गौरवाचे ठरेल. कुटुंबातील व्यक्तींशी बोलताना शब्द जपून वापरा. हे वर्ष तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाने नाव कमावून देईल.