1 / 12Numerology: नवग्रहांमध्ये राहु आणि केतु हे छाया-मायावी ग्रह मानले जातात. १८ महिने राहु-केतु एकाच राशीत विराजमान असतात. विद्यमान घडीला राहु आणि केतु अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत आहेत. मे महिन्याची सांगता होताना राहु आणि केतु ग्रह वक्री चलनाने अनुक्रमे कुंभ आणि सिंह राशीत विराजमान होणार आहे. अंकशास्त्रातील मूलांकांवरही याचा मोठा प्रभाव पाहायला मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. 2 / 12ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.3 / 12राहु आणि केतु यांच्या गोचराचा मूलांकांवर कसा प्रभाव असू शकेल? मे महिन्याची सांगता कोणत्या मूलांकांसाठी कशी ठरू शकेल? तुमचा मूलांक कोणता? जाणून घ्या...4 / 12ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. परदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. जलद निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे यश मिळत राहील. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल राहील. जीवनात आनंद आणि समृद्धी लाभू शकेल.5 / 12ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. नवीन मित्रांची भर पडू शकेल. कुटुंबातील सदस्यांचे समर्थन मिळेल. अतिरिक्त जबाबदारी घेताना विचार करावा. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. चर्चेद्वारे प्रकरणे सोडवली तर बरे होईल. आर्थिक बाबी सुधारण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील.6 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. प्रतिकूल परिस्थिती असली तरी सकारात्मकता आणि आशावाद सोडू नये. एखादे सरप्राइज मिळू शकते. एखाद्या समस्येत वरिष्ठांची मोलाची मदत मिळू शकेल. जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता.भागीदारीत केलेले प्रकल्प शुभ परिणाम देतील. गुंतवणुकीद्वारे नफा मिळेल.7 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. करिअरमध्ये उत्तमोत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. प्रवास फायदेशीर ठरू शकतील. परदेशातून एखादी आनंदवार्ता कानी पडू शकते. आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढू शकाल. सावधगिरीने केलेल्या गुंतवणुकीद्वारे नफा मिळवू शकाल. आर्थिक लाभासाठी काळ अनुकूल ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील.8 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. आत्मविश्वास उंचावेल. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. एखादी चुकीमुळे प्रतिमा मलिन होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्यावी. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. टीमवर्कने कोणताही प्रकल्प केला तर चांगले परिणाम दिसून येतील.9 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. व्यवसायात चांगली झेप घेता येऊ शकेल. काही करारात यश मिळू शकेल. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. प्रवासात मात्र अत्यंत काळजी घ्यावी लागेल. कडू-गोड अनुभव येतील. आत्मविश्वासाने निर्णय घेतल्यास शुभ परिणाम मिळतील. कामाच्या ठिकाणी हळूहळू सुधारणा होईल.10 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेले काम पूर्ण करण्याला सर्वोच्च प्राथमिकता द्यावी लागेल. शिक्षणात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. काही गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी मुत्सद्दीपणा आणि हुशारी खूप महत्त्वाची ठरेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तिमुळे करिअरला नवी दिशा मिळू शकेल. अंतर्ज्ञानाचे अनुसरण करून निर्णय घेतल्यास ते चांगले होईल.11 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. शांत आणि फोकस राहून काम केल्यास यश प्रगती साध्य करता येऊ शकेल. खर्चांत वाढ होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळावेत. घेतलेले निर्णय योग्य ठरू शकतील. चांगल्या भविष्याबद्दल विचार कराल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि मान-सन्मानही वाढेल. 12 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. सावध राहून निर्णय घ्यावे लागतील. एखाद्याला शब्द देताना विचार करावा. अन्यथा कालांतराने पश्चात्ताप होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.