By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 15:46 IST
1 / 5सध्या तरुणांमध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची क्रेझ आहे. हा दिवस प्रेम व्यक्त करण्याची उत्तम संधी मानला जातो. तरुण युगुलं या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. फुलगुच्छ, भेटकार्ड, चॉकलेट किंवा इतर भेटवस्तू देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात. अनेक जोडपी या दिवशी फिरायला जातात आणि एकमेकांबरोबर राहून प्रेमाचे क्षण अनुभवतात. ही संधी यंदा अनेकांना मिळणार आहे असे अंकशास्त्राचे भाकीत आहे. 2 / 5अंकशास्त्राबद्दल बोलायचे झाले तर, यावर्षी व्हॅलेंटाईन डेला अनेकांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. व्हॅलेंटाईन डेपूर्वी अनेकांना मनासारखा जोडीदार मिळू शकेल. एवढेच नाही तर पुढे दिलेल्या जन्मतारखेच्या जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण झाला असेल, तर तेही या निमित्ताने एकत्र येतील. चला तर जाणून घेऊ कोण असतील ते भाग्यवान? 3 / 5अंकशास्त्र तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांची जन्मतारीख २,५, ६,९, १२, १५, १८, २१, २५, २७, २८ यापैकी एक आहे त्यांना व्हॅलेंटाइन डेच्या आधी मनासारखा जोडीदार मिळू शकेल. जर तुम्ही अविवाहित असाल तर एखादी खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. जिच्या सहवासात आल्यावर तुमच्या मनाची खात्री पटेल, ज्या व्यक्तीचा शोध घेत होतो, हीच ती व्यक्ती आहे. 4 / 5एखादी व्यक्ती आवडणे आणि तिच्याबद्दल आकर्षण वाटणे, या दोन भिन्न बाबी आहेत. ज्या व्यक्तीला तुम्ही तिच्या गुण दोषांसकट, आर्थिक, शारीरिक, मानसिक परिस्थितीसकट स्वीकारू शकता, केवळ छान दिसते म्हणून नाही तर सध्या वेषात असतानाही तिच्यावर भाळू शकता, ते खरे प्रेम असेल आणि ते एकतर्फी असून उपयोग नाही, तर दोन्हीकडून असेल तरच ते रुजेल, फुलेल आणि बहरेल!5 / 5अंकशास्त्राने हे भाकीत वर्तवताना एक सूचना अशीही दिली आहे, की भावनेच्या भरात वाहवत न जाता केवळ तो एक दिवस साजरा करायचा आहे म्हणून एखाद्या व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड करून नका. ती व्यक्ती तुमच्या स्वभावाच्या उलट असेल तर तिच्या सहवासात तुमचा व्हॅलेंटाईन अविस्मरणीय होण्याऐवजी कायमस्वरूपी धडकी भरवणारा ठरेल. त्यामुळे व्यक्तीची निवड डोळसपणाने करा, जेणेकरून तुम्हाला एक दिवस नाही तर आयुष्यभर प्रेमदिवस साजरा करता येईल.